ऐन युद्धकाळात रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची प्रकृती बिघडली, कॅन्सर आणि पार्किन्सन सारख्या आजरांशी देतायेत लढा, लवकरच होणार ऑपरेशन
ऑपरेशनच्या काळात केवळ दोन ते तीन दिवसांसाठी युद्धाची कमान पुतिन निकोलाई यांच्याकडे देण्याची शक्यता आहे.
मॉस्को– युक्रेन आणि रशियाच्या युद्धकाळात (Russia-Ukraine war) एक मोठी बातमी समोर येते आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin)यांच्यावर लवकरच कॅन्सरची सर्जरी होण्याची शक्यता आहे. डेली मेलच्या माहितीनुसार, पुतिन यांना पोटाचा कॅन्सर आहे. त्यांच्यावर उपचाराची पूर्ण तयारीही करण्यात आली आहे. पुतिन लवकरच या युद्धाची कमान सिक्युरिटी कौन्सिल आणि फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस चे माजी प्रमुख निकोलई पुत्रशेव यांच्याकडे सोपवण्याची शक्यताही वर्तवण्यात येते आहे. पुतिन युद्धाच्या निर्णयांची पूर्ण जबाबदारी पुत्रशेव ( Nikolai Patrushev)यांच्याकडे सोपावणार असल्याची माहिती आहे. पुतिन यांना १८ महिन्यांपूर्वी कॅन्सर आणि पार्किंसनचा आजार झाल्याची माहिती रशियन माध्यमांनी क्रेमलिन अधिकाऱ्यांच्या सूत्रांनी दिली आहे. मात्र पुतिन यांची प्रकृती उत्तम असल्याचा दावाही हे अधिकारी करीत आहेत. रशियन माध्यमांनी दावा केला आहे की- क्रेमलिनच्या संरक्षण दलाच्या मोठ्या अधिकाऱ्याने सांगितले आहे की, पुतिन हे सध्या गंभीर वैद्यकीय परिस्थितीतून जात आहेत. या काळात त्यांचे ऑपरेशन होण्याची गरज आहे. मात्र अद्याप या ऑपरेशनची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही.
プーチンが実は癌で近く手術するとデイリーメール。いやこの媒体なので信憑性ゼロなんだけど、それはそれとして「手術中は権限をパトルシェフが代行」というのがなんともきわめて「嫌!」 https://t.co/JYPtysVK3i
हे सुद्धा वाचा— 黒井文太郎 (@BUNKUROI) May 2, 2022
निकोलाई यांच्याकडे कमान सोपवणे घटनाबाह्य
या सगळ्या परिस्थितीतही पुतिन थोड्या काळासाठीही सत्ता इतरांच्या हातात देण्यास तयार नाहीत. मात्र ऑपरेशनच्या काळात केवळ दोन ते तीन दिवसांसाठी युद्धाची कमान पुतिन निकोलाई यांच्याकडे देण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. पुतिन यांचे हे पाऊन घटनाबाह्य असल्याचे सांगण्यात येतेय. घटनेनुसार, राष्ट्राध्यक्षांच्या अनुपस्थितीत सर्व निर्णयांचे अधिकार हे पंतप्रधान मिखाईल मुशुस्तीन यांना द्यायला हवेत.
औषधांमुळे पुतिन यांना अशक्तपणा
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर जी औषधे पुतिन यांना देत आहेत, त्यामुळे पुतिन यांना चक्कर येणे, अशक्तपणा जाणवणे यासारख्य़ा अडचणींना सामोरे जावे लागते आहे. पुतिन यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना यानंतर हटविण्यातही आले. तर दुसरीकडे पुतिन यांना थेरॉईड कॅन्सर झाल्याचीही चर्चा आहे. ज्याच्यावर सातत्याने उपचार सुरु असल्याचे सांगण्यात येते आहे.
फोटोंमध्ये पुतिन दिसतायेत अशक्त
रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई शोइगु यांच्यासोबत चर्चेच्या आलेल्या एका छायाचित्रात पुतिन यांच्या चेहऱ्यावर सूज आल्याचे स्पष्ट दिसते आहे. त्याचबरोबर त्यांनी चक्कर येण्याचे टाळण्यासाठी टेबल घट्ट पकडून ठेवल्याचेही दिसते आहे. एका दुसऱ्या व्हिडिओत पुतिन यांच्या शरिरात कंप जाणवत असून ते त्याच्यावर मात करताना दिसत आहेत.