पाकिस्तानने पाच वर्ष युद्धबंदी म्हणून डांबून ठेवलेल्या जवानाची हेलावून टाकणारी कहाणी

नवी दिल्ली : भारतीय वायूसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचं भारतीय भूमीत झालंय. पाकिस्तानच्या ताब्यातून एखाद्या सैनिकाची काही तासात सुटका हा भारताचा ऐतिहासिक विजय आहे. इतिहासात असं पहिल्यांदाच घडलंय की जेव्हा 48 तासात सैनिकाची सुटका करण्यात आली. हातात तिरंगा घेऊन भारताच्या या वीरपुत्राचं स्वागत वाघा बॉर्डरवर करण्यात आलं. अभिनंदन यांच्या निमित्ताने काही युद्धबंदींच्या आठवणी ताज्या […]

पाकिस्तानने पाच वर्ष युद्धबंदी म्हणून डांबून ठेवलेल्या जवानाची हेलावून टाकणारी कहाणी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

नवी दिल्ली : भारतीय वायूसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचं भारतीय भूमीत झालंय. पाकिस्तानच्या ताब्यातून एखाद्या सैनिकाची काही तासात सुटका हा भारताचा ऐतिहासिक विजय आहे. इतिहासात असं पहिल्यांदाच घडलंय की जेव्हा 48 तासात सैनिकाची सुटका करण्यात आली. हातात तिरंगा घेऊन भारताच्या या वीरपुत्राचं स्वागत वाघा बॉर्डरवर करण्यात आलं. अभिनंदन यांच्या निमित्ताने काही युद्धबंदींच्या आठवणी ताज्या होतात, जे अभिनंदन यांच्याएवढे नशिबवान नव्हते.

उत्तर प्रदेशातील मेरठचे रहिवासी आणि भारतीय सैन्यात लान्स नायक असलेले मोहम्मद आरिफ यांची आठवणही प्रचंड वेदना देणारी आहे. कारगिल युद्धात ते पाकिस्तानच्या ताब्यात सापडले आणि त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. द्रास सेक्टरमध्ये आरिफ बेपत्ता झाले आणि पाकिस्तानच्या हाती लागले. युद्ध संपल्यानंतरही त्यांचा शोध लागला नाही. कुटुंबीयांना त्यांच्या येण्याची प्रतीक्षा होती. पण भारतीय सैन्याकडून त्यांना बेपत्ता घोषित करण्यात आलं आणि कुटुंबीयांची आशा मावळली.

लग्न झालं आणि सुट्टी रद्द झाल्याची बातमी आली

आरिफ यांच्या लग्नाला फक्त दहा दिवस झाले होते आणि सुट्टी रद्द झाल्याची बातमी आली. त्यांना तातडीने सीमेवर जावं लागलं. देशासाठी त्यांनी आपल्या पत्नीला सोडलं आणि रणभूमीवर रवाना झाले. युद्धात ते शत्रूंच्या हाती लागले. अनेक दिवस त्यांचा शोध घेऊनही पत्ता लागला नाही. यादरम्यानच धक्का सहन न झाल्याने त्यांच्या आईचं निधन झालं.

पत्नीचं दुसरं लग्न आणि आरिफ यांचं कमबॅक

आरिफ यांना बेपत्ता घोषित केल्यानंतर त्यांची परतण्याची आशा कुटुंबीयांनी सोडली होती. आरिफ यांची वाट पाहून पत्नीच्या डोळ्यातील अश्रूही सुकले होते. दोन्ही कुटुंबांनी आता त्यांच्या पत्नीच्या जीवनाचा विचार केला आणि दुसरं लग्न लावून दिलं. कुटुंबातीलच एका व्यक्तीशी आरिफ यांच्या पत्नीचं लग्न झालं.

आपल्या नशिबात हेच आहे असं समजून आरिफ यांच्या पत्नीने नवं जीवन सुरु केलं. पण या स्टोरीमध्ये खरा सस्पेन्स अजून बाकी होता. 2004 साली आरिफ यांचे भाऊ हमीद यांना पाकिस्तानमधील रावळपिंडी तुरुंगातून एक पत्र आलं. हे पत्र खुद्द आरिफ यांनी लिहिलं होतं. मी जीवंत असून पाकिस्तानने रावळपिंडी तुरुंगात बंद केलंय, असं त्यांनी पत्रात सांगितलं. मेरठच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हे पत्र भारत सरकारपर्यंत पोहोचवलं आणि यानंतर आरिफ यांनी सोडवण्याची प्रक्रिया सुरु झाली. जिनेव्हा कराराअंतर्गत आरिफ यांची सुटका करण्यात आली. वाघा बॉर्डरवर त्यांचं जल्लोषात स्वागत झालं. वाघा बॉर्डरवर आलेल्या कुटुंबीयांमध्ये त्यांना त्यांची पत्नी दिसली नाही.

आरिफ यांनी पत्नीला परत आणण्याचा पण केला

पत्नीचं दुसरं लग्न लावून दिलंय हे आरिफ यांना पटलं नाही. त्यांनी तिला परत आणण्याचा निर्णय घेतला. पण आरिफ यांची पत्नी गरोदर होती. अनेक प्रयत्न करण्यात आले, कुटुंबीयांनीही चर्चा केली. आरिफ यांची पत्नी गुडियाला सातवा महिना चालू होता. ते मुल दुसऱ्या पतीच्या ताब्यात देऊन गुडियाने परत यावं, अशी आरिफ यांची इच्छा होती. पण मुलाला सोडण्यासाठी गुडिया तयार नव्हती.

आरिफ आणि गुडिया यांची कायमची ताटातूट

आरिफ यांनी गुडियाला स्वतःहून घटस्फोट दिला नव्हता, त्यामुळे शरीयतनुसार ती अजूनही त्यांची पत्नी होती. मुस्लीम धर्मगुरुंच्या हस्तक्षेपानंतर गुडियाने आरिफ यांच्या आयुष्यात परत येण्याचा निर्णय घेतला. मुलाचा जन्म झाल्यानंतर त्याला दुसऱ्या पतीच्या ताब्यात दिलं जाईल आणि दहा दिवसांनी गुडिया आरिफ यांच्याकडे येईल. पण मुलाच्या जन्मानंतर गुडियाला एनिमिया झाला आणि तिचा 2006 मध्ये मृत्यू झाला.

दुसऱ्या पत्नीचाही मृत्यू

आरिफ यांचं दुसरं लग्न शेजारच्याच गावातील शाईस्ता नावाच्या मुलीसोबत झालं. पण कॅन्सर झाल्यामुळे शाईस्ताचा लग्नानंतर दोन वर्षातच मृत्यू झाला. आरिफचं तिसरं लग्न शाईस्ताच्या बहिणीसोबत झालं. सध्या आरिफ त्याची तिसरी पत्नी आणि मुलांसोबत जीवन जगत आहे. आर्मीत प्रमोशन होऊ ते सुभेदार पदावर कार्यरत आहेत.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.