नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता आणली जात आहे. त्याचाच भाग म्हणून केंद्राने चित्रपट आणि टीव्ही मालिकांच्या चित्रीकरण सुरु करण्यास परवानगी दिली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावेडकर यांनी याबाबतची माहिती दिली. (Guidelines For television and movie Production Industry)
चित्रपट आणि टीव्ही मालिकांच्या चित्रीकरणाची आजपासून देशामध्ये पुन्हा सुरुवात होत आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे जावडेकरांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर केंद्राकडून काही गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत.
केवळ कॅमेऱ्यासमोरील व्यक्तींना मास्क न घालण्याची परवानगी देण्यात आली आहे.
चित्रीकरणातील इतर सर्व जणांना सर्ववेळ मास्क घालने बंधनकारक राहील सर्वांनी शारीरिक अंतराचे देखील पालन करायचे आहे
– @PrakashJavdekar#IndiaFightsCorona pic.twitter.com/VX4Y3diSR3
— PIB in Maharashtra ?? (@PIBMumbai) August 23, 2020
यानुसार चित्रपट आणि टीव्ही मालिकांचे चित्रीकरण करणाऱ्या सर्व लोकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिर्वाय असणार आहे. तसेच मास्क घालणेही गरजेचे असणार आहे. केवळ कॅमेऱ्यासमोरील व्यक्तींना मास्क न घालण्याची परवानगी देण्यात आली आहे.
चित्रपट आणि टीव्ही मालिकांच्या चित्रीकरणाची आजपासून देशामध्ये पुन्हा सुरुवात होत आहे
यासाठी जारी करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यान्वयन पद्धती कडे एक दृष्टिक्षेप#IndiaFightsCorona pic.twitter.com/6rf6GOGe5U
— PIB in Maharashtra ?? (@PIBMumbai) August 23, 2020
त्यासोबतच शूटिंगचे ठिकाण किंवा त्यासंबंधित इतर जागा सॅनिटायझेशन करणं गरजेचे आहे. तसेच जास्त गर्दी करु नये, असे आदेश दिले आहेत. त्याशिवाय हेअर स्टायलिस्ट, मेकअप आर्टिस्ट या लोकांना पीपीई किट घालणे गरजेचे असणार आहे. तसेच प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप असणेही बंधनकारक आहे.
चित्रपट आणि टीव्ही मालिकांच्या चित्रीकरणासाठी केंद्राच्या गाईडलाईन्स
संबंधित बातम्या :
सामान आणि प्रवासी वाहतुकीवरील निर्बंध काढण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु : अनिल देशमुख
आधी बोगस बियाणे, आता पिकांवर रोग, राज्यातील कृषी खातं झोपलं आहे का?, बच्चू कडूंचा सरकारला सवाल