सारानंतर आता सैफ अली खानचा मुलगाही बॉलिवूड पदार्पणाच्या तयारीत

मुंबई : अभिनेता सैफ अली खान आणि त्याची पहिली पत्नी अभिनेत्री अमृता सिंहची मुलगी सारा अली खानने गेल्यावर्षी बॉलिवूडमध्ये पादर्पण केलं. तिने ‘केदारनाथ’ आणि ‘सिम्बा’ या दोन चित्रपटातून आपली ओळख निर्माण केली आहे. आता सारानंतर सैफचा सैफचा मुलगा इब्राहिम खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे.  मलाही सारासारखे हिंदी सिनेमामध्ये काम करायचं आहे, असं इब्राहिमने […]

सारानंतर आता सैफ अली खानचा मुलगाही बॉलिवूड पदार्पणाच्या तयारीत
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

मुंबई : अभिनेता सैफ अली खान आणि त्याची पहिली पत्नी अभिनेत्री अमृता सिंहची मुलगी सारा अली खानने गेल्यावर्षी बॉलिवूडमध्ये पादर्पण केलं. तिने ‘केदारनाथ’ आणि ‘सिम्बा’ या दोन चित्रपटातून आपली ओळख निर्माण केली आहे. आता सारानंतर सैफचा सैफचा मुलगा इब्राहिम खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे.  मलाही सारासारखे हिंदी सिनेमामध्ये काम करायचं आहे, असं इब्राहिमने आपले वडिल म्हणजेच सैफ अली खानला सांगितलं आहे, अशी माहिती एका वृत्तसंस्थेने दिली.

इब्राहिमसाठी सैफने सिनेमानिर्मिती करण्याचं ठरवलं आहे. सध्या इब्राहिमसाठी विशेष तयारी केली जात आहे. मात्र साराने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवल्याने सैफ नाराज आहे.  साराने पहिलं आपलं शिक्षण पूर्ण करावे आणि त्यानंतर अभिनय क्षेत्रात पदार्पण करायला हवं होतं, असं सैफचं म्हणणं आहे. मात्र साराने फिल्मक्षेत्र निवडलं. तिच्या या निर्णयासाठी आई अमृता सिंहचा पाठिंबा होता.

आता सारानंतर तिचा भाऊ इब्राहिम फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु आहे. साराच्या जबरदस्त कामगिरीची सध्या बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. तिच्या अभिनयाचं कौतुकही केलं जात आहे. मात्र इब्राहिम बॉलिवूडमध्ये कशाप्रकारे आपली छाप सोडतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सारा अली खानला नुकतेच केदारनाथ सिनेमात उत्कृष्ट अभिनय केल्यामुळे फिल्मफेअर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. सारा आगामी लव्ह आज कल 2 या सिनेमात अभिनेता कार्तिक आर्यनसोबत दिसणार आहे.

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.