जय शाहांनी विराटपेक्षा जास्त सिक्सर मारल्या की सचिनपेक्षा जास्त शतकं ? अमित शाह नसते तर जय शाह … घराणेशाहीच्या आरोपांवरून संजय राऊतांचे चोख प्रत्युत्तर

इंडिया आघाडीमध्ये घराणेशाही आहे, हा अमित शाहांचा आरोप हास्यास्पद आहे. घराणेशाही तर भाजपानेच पोसली. जय शाहांना बीसीसीआयचं अध्यक्ष कोणत्या आधारे केलं ? अमित शाह गृहमंत्री नसते तर जय शाह बीसीसीआयमध्ये दिसले तरी असते का ? असा सवाल विचारत संजय राऊत यांनी अमित शाहांवर टीका केली.

जय शाहांनी विराटपेक्षा जास्त सिक्सर मारल्या की सचिनपेक्षा जास्त शतकं ? अमित शाह नसते तर जय शाह ... घराणेशाहीच्या आरोपांवरून संजय राऊतांचे चोख प्रत्युत्तर
Follow us
| Updated on: Feb 28, 2024 | 11:17 AM

मुंबई | 28 फेब्रुवारी 2024 : इंडिया आघाडीमध्ये घराणेशाही आहे, हा अमित शाहांचा आरोप हास्यास्पद आहे. घराणेशाही तर भाजपानेच पोसली. जय शाहांना बीसीसीआयचं अध्यक्ष कोणत्या आधारे केलं ? अमित शाह गृहमंत्री नसते तर जय शाह बीसीसीआयमध्ये दिसले तरी असते का ? असा सवाल विचारत संजय राऊत यांनी अमित शाहांवर टीका केली. ‘ मुलगा मुख्यमंत्री व्हावा असं उद्धव ठाकरेंना वाटतं. घराणेशाहीवाले सत्तेच्या स्वार्थासाठी एकत्र आलेत’, अशी टीका गृहमंत्री अमित शाह यांनी केली होती. टीव्ही9च्या ग्लोबल समिटमध्ये बोलताना त्यांनी घराणेशाहीच्या मुद्यावरून टीकास्त्र सोडलं. त्यांच्या या टीकेला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी चोख प्रत्युत्तर दिलं.

अमित शाहांचं वक्तव्य हास्यास्पद 

माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी अमित शाहांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.  घराणेशाहीची गोष्ट करता, जय शहा आपल्या घराण्याचे नाहीत का, जय शहा आपले चिरंजीव आहेत ते गृहमंत्र्यांचे चिरंजीव आहेत त्यामुळे ते भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी विराट कोहलीपेक्षा जास्त सिक्सर ठोकल्या की सचिनेपक्षा जास्त शतकं आहेत त्यांची ? की कपिल देव यांच्यापेक्षा जास्त विकेट्स घेतल्या त्यांनी ? असा सवाल राऊत यांनी विचारला.  कोणाच्या घराणेशाहीवर आपण बोलतायत, ठाकरे आणि पवारांची घराणेशाही देशाला आणि समाजाला कायम निर्णयदायी दिशा देणारी आहे, इथे कोणाला मुख्यमंत्री बनायचं नाही.  माझ्या माहितीप्रमाणे अमित शहा यांना प्रधानमंत्री व्हायचं आहे पण मी अजून सांगतो नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आहेत. सत्तेचा सारीपाट तुमच्या इशारावर चालणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

घराणेशाही तेव्हा म्हटली जाते जेव्हा घराण्याला प्रतिष्ठा असते. या देशातील काही घरांना प्रतिष्ठा आहे त्यातील एक ठाकरे घराण्याला, या देशात शरद पवारांच्या घराण्याला देखील प्रतिष्ठा आहे कारण या दोन्ही घराण्यांनी देशाला, महाराष्ट्राला, समाजाला खुप काही दिलं आहे.  ठाकरे घराण्याला प्रतिष्ठा आहे. ठाकरे कुटुंब काही आकाशातून पडलं नाही. महाराष्ट्रासाठी, हिंदुत्वासाठी ठाकरे कुटुंबांचं मोठं योगदान आहे. या घराण्यांचे लाभार्थी नरेंद्र मोदी आणि अमित शहा सुद्धा आहेत हे त्यांनी आपल्या मनाला विचाराव, बाळासाहेब ठाकरे यांच्या घराण्याचा वारसा हिंदुत्वाचा आहे त्याचाही लाभ भारतीय जनता पक्षाने वारंवार घेतलेला आहे, बाळासाहेब ठाकरे जर नसते तर भारतीय जनता पार्टी राज्यात औषधालाही दिसला नसता, बाळासाहेबांचा आणि त्यांच्या घराण्याचं बोट धरून राज्यात भाजप पक्ष वाढलेला आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.