लॉकडाऊनमध्ये पक्ष्यांना दाणे टाकणेही महत्त्वाचं, मॉर्निंग वॉकसाठी मिळालेल्या पासवर सलीम खान यांचं स्पष्टीकरण
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊन कायम (Salim Khan morning walk during lockdown) आहे.
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊन कायम (Salim Khan morning walk during lockdown) आहे. या दरम्यानच्या काळात सामान्य नागरिकांना कारणाशिवाय घराबाहेर पडण्याची परवानगी नाही. असं असताना बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांना लॉकडाऊनच्या काळात मॉर्निंग वॉकला जाण्याची परवानगी कशी मिळाली असा सवाल विचारला जात होता. त्याचा खुलासा खुद्द सलीम खान यांनीच केला (Salim Khan morning walk during lockdown) आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सलीम खान म्हणाले, ” मी गेल्या 40 वर्षांपासून मॉर्निंग वॉकला जातोय. तसेच कित्येक वर्षांपासून आमच्या परिसरातल्या पक्ष्यांना दाणे टाकतो. लॉकडाऊनच्या काळात त्यांची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे.”
“मला पाठीचा त्रास असल्यानं चालणं आवश्यक आहे. माझं चालणं थांबलं तर माझ्या पाठीचा त्रास वाढू शकतो. मॉर्निंग वॉकसाठी 30 एप्रिलपर्यंत सरकारकडून मला पास मिळाला आहे. सगळ्या नियमांचं काटेकोरपणे पालन करत मी वॉकला जातो. माझ्याप्रमाणेच अनेक लोक आपापल्या पाळीव प्राण्यांना घेवून येत असतात पण त्यांची तक्रार कुणी करत नाही. पण मी सेलिब्रिटी असल्यामुळे माझ्यावर टीका केली जाते”, असंही सलीन खान यांनी सांगितले.
सलमानचे वडील सलीम खान दररोज आपल्या मित्रांसोबत मॉर्निंग वॉकला जातात. सकाळी साडेआठ ते नऊ वाजेपर्यंत ते घराबाहेर फिरत असतात. जर नियम सर्वांसाठी सारखेच आहेत. तर पोलीस प्रशासन सलमानच्या वडिलांवर कारवाई का करत नाही? की केवळ ते सेलिब्रिटी आहेत म्हणून त्यांना लॉकडाउनचे नियम लागू होत नाहीत? असा प्रश्न वांद्रे इथल्या स्थानिकांनी सरकारला विचारला होता.