संजय राऊतांच्या निषेधार्थ संभाजी भिडेंकडून ‘सांगली बंद’ची हाक

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माजी खासदार छत्रपती उदयन राजे भोसले यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याविरोधात आज सांगली जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.

संजय राऊतांच्या निषेधार्थ संभाजी भिडेंकडून 'सांगली बंद'ची हाक
Follow us
| Updated on: Jan 17, 2020 | 9:33 AM

सांगली : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माजी खासदार छत्रपती उदयन राजे भोसले यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज शुक्रवारी (17 जानेवारी) सांगली जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आज सांगली बंदचं आवाहन केलं आहे (Sangali Band against Sanjay Raut). सांगलीमध्ये आज सकाळपासून दुकानं बंद आहेत. महत्त्वाचं म्हणजे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सांगली दौऱ्यावर आहेत. त्यामुळे या बंदचा परिणाम मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर होण्याची शक्यता आहे. सांगली बंद आणि मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सांगलीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

“संजय राऊतांनी उदयनराजेंबद्दल वक्तव्य करुन देशाचा अपमान केला. हा अपमान छत्रपती परंपरेचा अपमान आहे, असं आम्ही मानतो. याचा निषेध म्हणून 17 जानेवारीला सांगली बंद राहील” असं संभाजी भिडे म्हणाले (Sangali Band against Sanjay Raut). संजय राऊत यांना पदावरुन हटवावे अन्यथा बंद यापुढेही कायम राहील असा इशाराही संभजी भिडे यांनी दिला होता.

संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणाऱ्या पुस्तकावर टीका करत उदयनराजेंना सवाल केले होते. त्यावेळी उदयनराजेंनी थेट शिवसेनेला लक्ष करत शिवसेना नाव ठेवताना छत्रपतींच्या वंशजांना विचारलं होतं का, असा प्रतिसवाल केला. त्यानंतर संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर सर्वांचा अधिकार आहे, कुणा एकाची ती मक्तेदारी नाही, असं म्हणत उदयनराजेंनी छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे दाखवावे, असं म्हटलं होतं. त्यानंतर हा वाद आणखी चिघळला. आता संभाजी भिडे हे उदयन राजेंच्या समर्थनात उतरले आहेत.

संजय राऊत काय म्हणाले होते?

भाजपचे नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाज महाराजांवरील वादग्रस्त पुस्तकावर बोलताना शिवसेनेवर सडकून टीका केली होती. शिवसेनेने “शिवसेना” हे नाव ठेवताना छत्रपतींच्या वंशजांची परवानगी घेतली होती का? असा प्रश्न केला होता. तसेच शिवसेनेचं नाव बदलून ठाकरे सेना करा असा खोचक सल्लाही उदयनराजे यांनी शिवसेनेला दिला होता. यावर संजय राऊत उदयनराजे भोसलेंवर हल्लाबोल केला.

संजय राऊत म्हणाले, उदयनराजेंनी शिवसेना हे नाव ठेवताना वंशजांना विचारलं होतं का असा प्रश्न करत आहेत. मात्र, त्यांनी ते वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावेत. छत्रपती शिवाजी महाराज हे या विश्वाचं दैवत आहे. आम्ही जेव्हा गणपतीची पूजा करतो तेव्हा तुझी पूजा करु का म्हणून विचारायला जात नाही.”

Sangali Band against Sanjay Raut

संबंधित बातम्या :

उदयनराजेंनी वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावे : संजय राऊत

शिवसेनेच्या नावाबद्दल प्रश्न विचारण्यापूर्वी कोल्हापूरच्या शाहू महाराजांशी चर्चा करा, संजय राऊतांचा सल्ला

पाहा व्हिडीओ :

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.