Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेची ग्रामपंचायतीत एन्ट्री, महाराष्ट्रातून पहिला विजय रूपाली ठमकेंचा…

स्वराज्य संघटनेचा विजयाचा श्रीगणेशा हा नाशिक जिल्ह्यातील गणेशगावातील एका महिलेच्या रूपाने मिळाला असून रूपाली ठमके असे महिलेचे नाव आहे.

संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेची ग्रामपंचायतीत एन्ट्री, महाराष्ट्रातून पहिला विजय रूपाली ठमकेंचा...
Image Credit source: FACEBOOK
Follow us
| Updated on: Sep 19, 2022 | 4:08 PM

नाशिक : राज्यातील आज बहुतांश ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीचे (Grampanchayat Election) निकाल समोर येत आहे. त्यातच संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांच्या स्वराज्य संघटनेच्या (Swarajya Sanghatna) महिला कार्यकर्त्या ग्रामपंचायतीवर निवडून आल्या आहेत. महाराष्ट्रातून पहिला विजय हा स्वराज्य संघटनेला नाशिकच्या गणेश गावातून मिळाला आहे. स्वराज्य संघटनेचा विजयाचा श्रीगणेशा हा नाशिक जिल्ह्यातील गणेश गावातील एका महिलेच्या रूपाने मिळाला असून रूपाली ठमके असे महिलेचे नाव आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत रूपाली ठमके यांना स्वराज्य संघटनेच्या पुरस्कृत उमेदवारी देण्यात आली होती. नाशिक तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्वराज्य संघटनेचे पुरस्कृत उमेदवार देण्यात आलेले होते.

राज्यसभेला संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी दाखल करण्यापूर्वी स्वराज्य संघटना सुरू करत असल्याची घोषणा केली होती.

स्वराज्य संघटना हा सध्या पक्ष नसला तरी स्वराज्य संघटना पुरस्कृत म्हणून निवडणुकीत उमेदवारी देण्याचे कामे केले होते.

नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुक्यातील बहुतांश ठिकाणी स्वराज्य संघटना पुरस्कृत उमेदवार देण्यात आलेले आहेत.

त्यापैकी गणेशगाव येथे सरपंच पदासाठी रूपाली ठमके यांना पुरस्कृत उमेदवारी देण्यात आली होती. त्यांचा तिथे विजय झाला आहे.

याशिवाय राजेवाडी, गंगावरे-सावरगाव ग्रुप ग्रामपंचायत येथेही स्वराज्य संघटना पुरस्कृत उमेदवारी देण्यात आली होती.

रूपाली ठमके यांच्या रूपाने स्वराज्य संघटनेला पहिली सरपंच महिला निवडून येण्याचा मान मिळाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती आणि संघटनेचे प्रवक्ते करण गायकर यांनी फोनद्वारे रूपाली यांचे अभिनंदन केले आहे.

स्वराज्य संघटनेचे नाशिक तालुक्यातील आणखी दोन उमेदवार आघाडीवर असून त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

.. अन् सुनील तटकरे मंत्रालयाकडे पायीच निघाले
.. अन् सुनील तटकरे मंत्रालयाकडे पायीच निघाले.
'भैय्यांना महाराष्ट्रात राहू द्यायचं की नाही...’, मनसे नेत्याचा इशारा
'भैय्यांना महाराष्ट्रात राहू द्यायचं की नाही...’, मनसे नेत्याचा इशारा.
अहमदाबादमध्ये कॉंग्रेस कार्यकर्णीच्या बैठकीला सुरुवात
अहमदाबादमध्ये कॉंग्रेस कार्यकर्णीच्या बैठकीला सुरुवात.
निव्वळ दादागिरी, सर्व अटी भंग अन्..., गंभीर आरोप करत धंगेकरांची मागणी
निव्वळ दादागिरी, सर्व अटी भंग अन्..., गंभीर आरोप करत धंगेकरांची मागणी.
अकोला ठरलं राज्यातलं हॉट सिटी; उष्णतेची उचांकी नोंद
अकोला ठरलं राज्यातलं हॉट सिटी; उष्णतेची उचांकी नोंद.
चिमुकलीवर लैंगिक अत्याचार अन् खिडकीतून खाली... मुंब्र्यात काय घडलं?
चिमुकलीवर लैंगिक अत्याचार अन् खिडकीतून खाली... मुंब्र्यात काय घडलं?.
कुणाल कामराच्या सुनावणीदरम्यान नेमकं काय घडलं? इनसाईड स्टोरी
कुणाल कामराच्या सुनावणीदरम्यान नेमकं काय घडलं? इनसाईड स्टोरी.
लाडक्या बहिणींनो जरा जपून, 65 महिलांच्या नावावर 20 लाखांचं कर्ज
लाडक्या बहिणींनो जरा जपून, 65 महिलांच्या नावावर 20 लाखांचं कर्ज.
लाडक्या बहिणींनो एप्रिलच्या हफ्त्याची वाट पाहताय? कधी येणार पैसे?
लाडक्या बहिणींनो एप्रिलच्या हफ्त्याची वाट पाहताय? कधी येणार पैसे?.
ट्रम्प यांचं टेरिफ धोरण; भारत-चीनचे संबंध सुधरतील?
ट्रम्प यांचं टेरिफ धोरण; भारत-चीनचे संबंध सुधरतील?.