माझं राज्य संकटात, मला हजर व्हावं लागेल, आईच्या पार्थिवाला अग्नी देऊन प्रांताधिकारी दीड दिवसात कर्तव्यावर!

स्वत:च्या आईचा मृत्यू झाल्यानंतरही अवघ्या दीड दिवसात प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे (Sangamner Prant adhikari Shashikant Mangarule) कर्तव्यावर हजर झाले.

माझं राज्य संकटात, मला हजर व्हावं लागेल, आईच्या पार्थिवाला अग्नी देऊन प्रांताधिकारी दीड दिवसात कर्तव्यावर!
Follow us
| Updated on: Mar 28, 2020 | 2:47 PM

शिर्डी : कोरोनाचं संकट गहिरं होत असताना, नगर जिल्ह्यातील संगमनेरचे प्रांताधिकारी यांनी सामाजिक भान जपलंय. स्वत:च्या आईचा मृत्यू झाल्यानंतरही अवघ्या दीड दिवसात प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे (Sangamner Prant adhikari Shashikant Mangarule) कर्तव्यावर हजर झाले. त्यांच्या याच कार्यतत्परतेची दखल खुद्द अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी घेतली. (Sangamner Prant adhikari Shashikant Mangarule)

करोनाचे राष्ट्रीय संकट असताना, संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांना त्यांच्या मातोश्रीचं निधन झाल्याचं वृत्त 24 मार्चला समजलं. एकीकडे समाज संकटात असताना दुसरीकडे स्वत:ची आई जग सोडून गेल्याचं दु:ख. मात्र आईच्या मृतदेहाला अग्नी देऊन, डॉ. शशिकांत मंगरुळे अवघ्या दीड दिवसात कर्तव्यावर हजर झाले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन आदेशांची काटेकोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. त्यासाठी पोलीस आणि महसूल विभागाचे अधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी आहे. सरकारी अधिकारी-कर्मचारी या बिकट परिस्थिती आपलं काम चोख बजावत आहेत.

अशा परिस्थितीत डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या मातोश्रीचं निधन झालं. यावेळी मंगरुळे यांनी आपल्या सहकारी अधिकाऱ्यांना जबाबदारीचे वाटप करुन, त्यांनी स्वतःच्या खासगी वाहनातून नाशिकला आणि तेथून जळगावातील पाचोरा तालुका गाठून, मूळगावी मातोश्रीचं अंत्यदर्शन घेतलं. त्यानंतर पार्थिवावर अंत्यसंस्कार करुन लगेचच ते कर्तव्यावर रुजू झाले. अंत्यसंस्कारानंतरचे धार्मिक विधी करुन डॉ. शशिकांत मंगरुळे  पुन्हा दीड दिवसात गुरुवारी (२६ मार्च) कर्तव्यावर हजर झाले.

दरम्यान प्रांताधिकारी शशिकांत मंगरूळे यांच्या कर्तव्यदक्षेतेची दखल राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली आणि त्यांना आभारपत्र पाठवलं.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.