सांगलीत अंत्यसंस्कार झालेली ‘ती’ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह नव्हती, सायन रुग्णालयाने अहवाल बदलला

सांगलीतील खेराडी वांगीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आलेली व्यक्ती 'कोरोना' पॉझिटिव्ह नव्हती, अशी माहिती सांगलीच्या जिल्हा प्रशासनाने दिली (Sangli dead person report Corona Negative) आहे.

सांगलीत अंत्यसंस्कार झालेली 'ती' व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह नव्हती, सायन रुग्णालयाने अहवाल बदलला
Follow us
| Updated on: Apr 30, 2020 | 9:34 AM

सांगली : सांगलीतील खेराडी वांगीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आलेली व्यक्ती ‘कोरोना’ पॉझिटिव्ह नव्हती, अशी माहिती सांगलीच्या जिल्हा प्रशासनाने दिली (Sangli dead person report Corona Negative) आहे. मुंबईत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीवर सांगलीत अंत्यसंस्कार झाल्यानंतर ती व्यक्ती ‘कोरोना’ पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल सायन हॉस्पिटलने दिला होता. मात्र आता आपलाच अहवाल बदलत सायन हॉस्पिटलने ती व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह नसल्याचे सांगितल्याने सांगली प्रशासनाचा जीव भांड्यात पडला आहे. (Sangli dead person report Corona Negative)

सायन हॉस्पिटलने दिलेल्या चुकीच्या अहवालामुळे सांगली जिल्ह्याला नाहक मनस्ताप सहन करावा लागल्याचं बोललं जात आहे. चुकीच्या अहवालामुळे सांगलीतील खेराडे वांगी गावात भीतीचं वातावरण पसरलं होते. त्यासोबत आरोग्य, पोलीस, जिल्हा प्रशासन यंत्रणेचंही धाबं दणाणलं होतं.

काहीदिवसांपूर्वी मुंबईत मृत झालेल्या व्यक्तीवर सांगीलीतील खेराडी गावात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. अंत्यसंस्कार झाल्यावर दोन दिवसांनी सायन हॉस्पिटलकडून ती व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह होती, असं सांगली जिल्हा प्रशासनाला सांगण्यात आले होते. त्यांनतर खेराडी वांगी गावात तसेज आजूबाजूची सर्व गावं सील करुन यंत्रणा कार्यरत करण्यात आली होती.

त्यासोबत जिल्हा प्रशासनाने अधिकची खबरदारी म्हणून संबंधित मृत व्यक्तीच्या 36 निकटवर्तीयांना कडेगाव येथे इन्स्टिट्यूशनमध्ये क्वारंटाईन केले होते. खेराडी वांगी हे गाव सील करण्यात आले होते. संपूर्ण आरोग्य, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाची यंत्रणा या ठिकाणी कार्यरत होती. त्याशिवाय खेराडी वांगी शेजारील गावंही सील करण्यात आली होती.

आता मात्र खेराडी वांगीत अंत्यसंस्कार झालेल्या त्या मृत व्यक्तीबाबत खुलासा प्राप्त झाला आहे. सदर व्यक्तीचा मृत्यू हा कोरोना विषाणूने झालेला नव्हता, असे अहवालात स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या : 

सांगलीतील व्यक्तीचा रिपोर्ट मुंबईत पॉझिटिव्ह, डॉक्टर, ड्रायव्हरसह 24 जण क्वारंटाईन

विळखा वाढला, सांगलीत एकाच कुटुंबातील 9 जणांना कोरोनाची लागण

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.