सांगली : जतचे माजी आमदार मधुकर कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या 55 व्या वर्षी सांगलीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 29 व्या वर्षी सांगलीतून अपक्ष निवडणूक लढवून ते आमदार झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. (Sangli Jat Ex MLA Madhukar Kamble Dies)
मधुकर कांबळे 1995 मध्ये जत विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून आमदारपदी निवडून आले होते. वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना मिळाली होती.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सलग दोन वेळा आमदार असणाऱ्या उमाजी सनमडीकर यांचा 1995 साली मधुकर कांबळे यांनी आश्चर्यकारकरित्या पराभव केला होता. काँग्रेसमधील तत्कालीन नाराज नेते एकत्र येऊन उमाजी सनमडीकर यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. श्रीमंत डफळेसरकार, विलासराव जगताप, सुरेश शिंदे यांनी मधुकर कांबळे यांची उमेदवारी जाहीर केली. अपक्ष लढणाऱ्या मधुकर कांबळे यांनी उमाजी सनमडीकर यांचा पराभव केला होता.
युती सरकारला समर्थन
मधुकर कांबळे हे 1995 ते 1999 या कालावधीत आमदार होते. सांगली जिल्ह्यात त्यावेळी पाच अपक्ष आमदार निवडून आले होते, या सर्वांनी युती करुन तत्कालीन शिवसेना-भाजप युती सरकारला समर्थन दिलं होतं.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
ताकारी – म्हैसाळ जल सिंचन योजना सुरु करुन दुष्काळी जत, कवठे महांकाळ, मिरज पूर्व भाग, आटपाडी, खानापूर, तासगाव पूर्व भागाला पाणी द्यावे, अशी आग्रही मागणी त्यावेळच्या अपक्ष आमदारांनी केली, त्यात माजी आमदार मधुकर कांबळे यांची भूमिकाही महत्वाची होती. शिवसेना-भाजपा युती सरकारच्या काळातच ताकारी आणि म्हैसाळ जलसिंचन योजनेची सुरुवातही झाली होती.
VIDEO : सुप्रिया सुळे-धनंजय महाडिक यांची भेट |मुंबईतील भेटीनंतर कोल्हापुरात चर्चेला उधाण pic.twitter.com/Vc69D4Y8Tm
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 24, 2020