आधी मंदिराला प्रदक्षिणा, नंतर थेट मारुतीरायाला दंडवत, हनुमान मंदिरात वानर गतप्राण
त्याने दंडवत घालून प्राण सोडल्याने नागरिकाकंडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Sangli Monkey Death In Front On Hanuman Temple)

सांगली : मिरज तालुक्यातील गुंडेवाडी येथे शनिवारी एक अद्भूत घटना घडली. दक्षिणमुखी हनुमान मंदिरात शनिवारी सकाळी एका वानराने प्रवेश केला. त्याने मारुतीरायाला दंडवत घालत प्राण सोडला. ज्या शनिवारी भाविक बजरंगबलीची मनोभावे पुजा करतात. त्याच शनिवारी हे वानर मंदिरात आल्याने आणि त्याने दंडवत घालून प्राण सोडल्याने नागरिकाकंडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Sangli Monkey Death In Front On Hanuman Temple)
काही भाविकानी ही घटना मोबाईलमध्ये कैद केली. दक्षिणमुखी पुरातन हनुमान मंदिरात या वानराच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागली आहे.
गुडेवाडी येथे दक्षिणमुखी पुरातन मारुती मंदिराचा जिर्णोद्धार गेल्या पाच ते सहा वर्षीपूर्वी केला आहे. या मंदिरात सांगली, मिरज, अथणी, सातारा, कोल्हापूर, रायबाग, मुंबई, पुणे येथून भक्तगण प्रत्येक शनिवारी दर्शनासाठी येत असतात. पण नवे वर्ष सुरू झाल्याने शनिवारी सकाळी भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती.
तितक्यात एक वानराचा कळप मंदिराजवळ असणाऱ्या झाडावर बसला होता. त्यावेळी या कळपातील एक वानर अचानक मंदिरात शिरले. ते मंदिराच्या गाभाऱ्याच्या उंबऱ्यावर येऊन बसले. मंदिरातील मारुतीरायाला या वानराने साष्टांग दंडवत घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही वेळाने हे वानर मंदिराला प्रदक्षिणा घालून मंदिराच्या दारात उंबऱ्यावरच बसून राहिले. त्यानंतर अनेक भाविकांनी या वानराचे दर्शन घेतले.
मंदिरात प्रवेश केल्यानंतर गाभाऱ्याच्या उबरठ्यांवर दक्षिणेकडे तोंड करून हे वानर बराच वेळ तिथेच बसले होते. त्या वानराची हालचाल बंद झाली होती. बराच उशीर ते वानर तेथून हालत नसल्याने ग्रामस्थांनी त्याला जवळ जात पाहिले असता, त्याने गाभाऱ्यावरच प्राण सोडले असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
विज्ञान युगात साक्षात पुरातन असणाऱ्या दक्षिण मुखी हनुमान मंदिराच्या उंबऱ्यावर वानराने प्राण सोडल्याची घटना याची देही याची डोळा’ भाविकाना पाहायला मिळाली. शनिवार हा हनुमानाचा दिवस आणि हनुमान मंदिरातच वानराने प्राण सोडल्याची माहिती भाविकांना समजल्यानतर अनेकांनी दर्शनासाठी गर्दी केली. (Sangli Monkey Death In Front On Hanuman Temple)
संबंधित बातम्या :