AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हेल्मेटने बाईकचा स्पीड कमी-जास्त, चोरीलाही आळा, सांगलीच्या पठ्ठ्याचा अवाक करणारा शोध

या हेल्मेटचा वापर अपघात रोखण्यासाठी आणि गाडीचा वेग कमी जास्त करण्यासाठी केला जाऊ शकतो.

हेल्मेटने बाईकचा स्पीड कमी-जास्त, चोरीलाही आळा, सांगलीच्या पठ्ठ्याचा अवाक करणारा शोध
| Updated on: Nov 07, 2020 | 4:24 PM
Share

सांगली : सांगली जिल्ह्यातील विटा येथील युवकाने अत्याधुनिक पद्धतीचे हेल्मेट कल्पकतेने (Sangli Theft Free Helmet) आणि मेहनतीने बनवले आहे. या हेल्मेटचा वापर अपघात रोखण्यासाठी आणि गाडीचा वेग कमी जास्त करण्यासाठी केला जाऊ शकतो. विविध युक्त्या करत विट्यातील तरुणाने हे हेल्मेट संशोधन केले आहे. या हेल्मेटला आता परदेशातूनही मागणी येऊ लागली आहे (Sangli Theft Free Helmet).

भोजलींग कुंभार असं या तरुणाचं नाव आहे. तो सांगलीतील खानापूर तालुक्यात राहातो. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्याने आयटीचे शिक्षण पूर्ण केले. सहा वर्षांपूर्वी त्याच्या डोक्यावरुन वडिलांचे छत्र हरपले. त्यानंतर आईच्या कष्टाने आणि आजीच्या पेन्शनच्या सहाय्याने त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरु होता. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून तो लाईट फिटिंगचे काम करत आहे. मात्र, या लॉकडाऊनच्या काळात या तरुणाने एका हेल्मेटचे संशोधन केले.

काही वर्षांपूर्वी भोजलींगच्या निकट वर्तीयाचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात त्याने बसल्या-बसल्या देशात होणारे अपघात कसे कमी होतील यावर तर्क-वितर्क लावण्यास सुरुवात केली. त्यातूनच त्याने अत्याधुनिक हेल्मेट बनवण्याचे ठरवले आणि मेहनत करुन हे अत्याधुनिक हेल्मेट बनवले.

फारसा खर्च न करता त्याने टाकाऊ किंवा वापरात नसलेल्या वस्तूंपासून सोपी सुविधा करुन सुरक्षित आणि वापरायला सुलभ हेल्मेट तयार केले आहे. या हेल्मेट मध्ये रिसिव्हर आणि ट्रान्समिटर असे दोन प्रकारचे सेन्सर बनवले आहेत. तर चिपद्वारे आयसीला प्रोग्रॅमिंग बनवले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान यंत्रणा विकसित करत हे हेल्मेट तयार केले आहे. त्यामुळे हेल्मेटमुळे गाडी चोरी होणार नाही, अशी यंत्रणा बसवली आहे.

तसेच, चोरीपासून बाईकचं संरक्षण होणार आहे. अपघातावेळी इमर्जन्सीसाठी ऑटोमेटिक कॉलची सुविधा, रात्री पार्किंगमधील गाडी शोधण्यासाठी वायरलेस हेडलाईट, सरंक्षणासाठी वायरलेस हॉर्न, इत्यादी सुविधा या हेल्मेटमध्ये उपलब्ध आहेत.

भोजलींग यांनी या हेल्मेटचं पेटेंटही मिळवले आहे. तर परदेशातून या हेल्मेटला खूप मागणी वाढली आहे. पण परिस्थिती नसल्याने प्रॉडक्शन करता येत नाही. भोजलींग याला हे हेल्मेट भारतात द्यायचे आहे. त्यासाठी सरकारने मदत करुन या हेल्मेटचा भारतात फायदा होईल(Sangli Theft Free Helmet).

हेल्मेटची वैशिष्ट्य काय?

  • चोरापासून बाईकचे सरंक्षण होईल, तर अपघाती मृत्यू दर कमी होईल. अपघातावेळी इमर्जेंन्सी काळात ऑटोमॅटिक कॉलचे फंक्शन उपलब्ध
  • रात्रीच्या वेळी पार्किंगमधील बाईक शोधेण्यासाठी वायरलेस हेडलाईट सिस्टम.
  • वायरलेस हॉर्न सिस्टम
  • गूगल मॅप इनबिल्ट असल्यामुळे प्रवासात वाया जाणार वेळ आणि पेट्रोल वाचेल
  • इनबिल्ट चाविसाठी कोडिंग हार्डवेयर सिस्टिम असल्यामुळे हेल्मेट असताना बाईकला चावीची गरज भासणार नाही.
  • जर बाईक चालकाने हेल्मेट घातले नाही. तर बाईकला चावी तर लागणारच शिवाय बाईकची स्पीड ही 40kmh पर्यंत मर्यादीत राहील. डॅशबोर्डला ‘please wear helmets You are in risk’ असा मेसेज दाखवेल
  • हेल्मेट घातले तर बाईकला चावीची गरज भासणार नाही आणि बाइकची स्पीड ही 120Kmh पर्यंत वाढू शकेल आणि डॅशबोर्डवर हिरवा सिग्नल मिळेल. HAPPY Journey दाखवेल
  • हे सर्व सिस्टम सोलार सिस्टमवर चार्ज होते.
  • तर इमर्जेंन्सीवेळी हेल्मेटला 9 वाट बल्ब प्रकाश पडेल एवढी लाईट लागते.
  • हेल्मेट मोबाईल फोन चार्जिंगसाठी पावरबँक म्हणून वापरु शकता.
  • प्रवासात मनोरंजन करण्यासाठी म्युझिक सिस्टम, तर वायरलेस इंडिकेटर्स ब्लिंक करतात. वायरलेस ब्रेक लाईट आणि मोबाईल वरचे कॉल हेल्मेटमध्ये रिसिव्ह करता येतात.

Sangli Theft Free Helmet

संबंधित बातम्या :

टँकर आणि दुचाकीचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 3 जण जागीच ठार

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.