कपूर परिवारात मलायकाचं आगमन, संजय कपूरकडून ‘फॅमिली’ फोटो शेअर

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्या अफेयरची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. अभिनेता अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर,  मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्यात जवळीक वाढल्याचं पाहायला मिळालं. मात्र दोघांनी कधीही आपल्या नात्याबद्दल कधी वाच्यता केली नाही. गेल्या काही दिवसांपासून दोघे विविध ठिकाणी एकत्र पाहायला मिळाले. न्यू इयर पार्टीत दोघे एकत्र […]

कपूर परिवारात मलायकाचं आगमन, संजय कपूरकडून 'फॅमिली' फोटो शेअर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्या अफेयरची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. अभिनेता अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर,  मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्यात जवळीक वाढल्याचं पाहायला मिळालं. मात्र दोघांनी कधीही आपल्या नात्याबद्दल कधी वाच्यता केली नाही. गेल्या काही दिवसांपासून दोघे विविध ठिकाणी एकत्र पाहायला मिळाले. न्यू इयर पार्टीत दोघे एकत्र आनंद लुटताना दिसले. तसे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अर्जुन आणि मलायका दोघेही संजय कपूरच्या घरी पार्टीसाठी पोहोचले. दोघेही या पार्टीत हातात हात घालून होते.  संजय कपूर हा अर्जुन कपूरचा चुलता आहे. त्यामुळे कपूर कुटुंबात मलायकाची अधिकृत एण्ट्री होणार का अशी चर्चा सुरु झाली आहे. या पार्टीनंतर संजय कपूरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटोही शेअर केला आहे.

View this post on Instagram

Family ❤️

A post shared by Sanjay Kapoor (@sanjaykapoor2500) on

या फोटोत अर्जुन कपूर, मलायका अरोरा, संजय कपूर, महीप कपूर आणि करण जोहर आहे. संजयने फोटोला ‘फॅमिली’ असं कॅप्शन दिलं आहे.

काही दिवसांपूर्वीच करण जोहरचा चॅट शो कॉफी विथ करणमध्ये अर्जुनने आपण रिलेशनशीपमध्ये असल्याचं मान्य केलं होतं. मात्र त्याने नाव गुलदस्त्यात ठेवलं.

त्याआधी ‘इंडियाज गॉट टॅलेंट’च्या मंचावरही दोघांची विशेष केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. अर्जुन कपूर त्यावेळी ‘नमस्ते इंग्लंड’ सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी आला होता, तर मलायका या कार्यक्रमात जज होती. दोघेही मंचावर जाताना हातात हात घालूनच गेले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.