Sanjay Raut | गिरीश महाजन, अर्जुन खोतकर हे टपोरी, खोके वाटपाला ठिक, पण… संजय राऊत यांचा हल्लाबोल

| Updated on: Jan 26, 2024 | 4:23 PM

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा करायला कुणाचं शिष्टमंडळ पाठवता ? गिरीश महाजन, खोतकर हे टपोरी लोक आहेत. ते खोके घ्यायला चांगले आहेत. पण अशा मुद्यांवर चर्चा करण्यासाठी विरोधीपक्षनेते, गटनेते, जाणकार लोकांचं शिष्टमंडळ तयार करून सरकारने जरांगे पाटलांकडे गेलं पाहिजे.

Sanjay Raut | गिरीश महाजन, अर्जुन खोतकर हे टपोरी, खोके वाटपाला ठिक, पण... संजय राऊत यांचा हल्लाबोल
Follow us on

मुंबई | 26 जानेवारी 2024 : मराठ्यांना आरक्षण पाहिजे या मागणीसाठी मनोज जरांगे आंदोलन करत असून गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढला आहे. राज्याचं राजकारणही त्याममुळे ढवळून निघालं आहे. सध्या मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या वेशीवर आले आहेत. नवी मुंबईत त्यांच्यासह लाखो मराठा आंदोलक थांबले आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांच्याशी चर्चाही केली आहे. त्यात काही महत्त्वाचा निर्णय झाल्याचं सांगितलं जात आहे.

मात्र याच मुद्यावरून शिवसेना नेत संजय राऊत यांनी आज सकाळी सरकारवर कडाडून टीका केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून मनोज जरांगे यांच्याशी सरकारचं शिष्टमंडळ चर्चा करत आहे. कधी मंत्री गिरीश महाजन तर कधी खोतकर तर कधी बच्चू कडू जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करत असतात. याच मुद्यावर भर देताना संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा करायला कुणाचं शिष्टमंडळ पाठवता ? गिरीश महाजन, खोतकर हे टपोरी लोक आहेत. ते खोके घ्यायला चांगले आहेत. पण अशा मुद्यांवर चर्चा करण्यासाठी विरोधीपक्षनेते, गटनेते, जाणकार लोकांचं शिष्टमंडळ तयार करून सरकारने जरांगे पाटलांकडे गेलं पाहिजे, असे राऊत म्हणाले. मुख्यमंत्र्य़ांनी स्वत: जरांगेंशी चर्चा केली पाहिजे. सर्व पक्षांचं शिष्ठमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांनी जरांगेंशी चर्चा केली पाहिजे. हे काही एका पक्षाचं काम नाही, सर्व पक्षांनी मिळून ते केलं पाहिजे, असेही राऊत म्हणाले.

शिंदे गटातील नेत्यांनी भाजपासोबत हातमिळवणी केल्यापासून शिंदे-फडणवीसांच्या सरकारला खोके सरकार हिणवत संजय राऊत, उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी बऱ्याच वेळा टीका केली होती. त्याच्या पुनरुच्चार आजच त्यांनी केला. गिरीश महाजन, खोतकर वगैरे खोके घ्यायला चांगले आहेत, महत्वाच्या मुद्यांवर चर्चा करायला, ते सोडवायला असे लोक कामाचे नाहीत. त्यासाठी जाणकार लोकंच पाहिजेत असं संजय राऊत म्हणाले.

यावेळी त्यांना भाजपवरही कडाडून टीका केली.

भारतीय जनता पक्षाची दंगली घडवण्याची रणनीती आहे. 400 पारचा नारा दंगलीच्या आगेतून सुरु झालेला नारा आहे. अबकी बार 400 पार, हिंदू मुस्लिमांच जीव घेऊन 400 पार करायचं आहे का असा बोचरा सवालही त्यांनी विचारला.

इंडिया आघाडीबद्दलही राऊत स्पष्टपणे बोलले

इंडिया आघाडीबद्दलही संजय राऊत स्पष्टपणे बोलले . कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेचा फॉर्मुला अंतिम टप्प्यात आला आहे. सर्वपक्षीय प्रमुख लोक आले, वंचित बहूजनचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांशी चर्चा झाली. आमच्यात मतभेद नाहीत, एखाद्या जागेवरून मतभेद झाले असतील तर काही नाही असे ते म्हणाले. आम्हाला भाजपला हरवायच आहे, आमच भांडण कॉंग्रेस सोबत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणाचा लढा आता निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याचं सरकारकडून सांगण्यात येतंय. सरकारच्या शिष्टमंडळाने आज जरांगे यांच्याशी यशस्वी चर्चा केली. त्यानंतर ही माहिती देण्यात आली आहे. पण मनोज जरांगे पाटील यांनी याबाबत कोणतंही अधिकृत सुतोवाच केलेलं नाही. आज दुपारीच 2 वाजता मनोज जरांगे पाटील आपली निर्णायक भूमिका स्पष्ट करणार आहेत.