बिहारचे मुख्यमंत्री तेजस्वी यादव झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही, शेवटी जनभावना महत्त्वाची : संजय राऊत
बिहारचे मुख्यमंत्री तेजस्वी यादव झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही, असं सूचक विधान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
पुणे : बिहारच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान पार पडलं आहे. दुसऱ्या टप्प्यातला प्रचार शिगेला पोहोचला आहे. अशातच बिहारचे मुख्यमंत्री तेजस्वी यादव झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही, शेवटी जनभावना महत्त्वाची असते, असं महत्त्वपूर्ण विधान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. (Sanjay Raut On Bihar Election And Tejashwi yadav)
“सध्या बिहार विधानसभा निवडणुकीचं एकंदर चित्र पाहिलं तर उद्या तेजस्वी यादव बहुमताने बिहारचे मुख्यमंत्री झाले तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. कारण लोकभावना महत्त्वाची असते. ती दाबता येत नाही”, असं राऊत म्हणाले.
“ज्या मुलाच्या पाठीमागे सध्या पाठबळ नाही. त्याच्या घरातली माणसं तुरुंगात आहे. मग ती कोणत्याही कारणास्तव असो. त्याच्या कुटुंबाच्या पाठीमागे इन्कम टॅक्स, सीबीआयचा ससेमिरा लावला जातोय. तोच तरुण मुलगा हजारो लाखोंच्या सभा घेतोय आणि केंद्रीय राजसत्तेला आव्हान निर्माण करतोय. मला वाटतं बिहारच्या निवडणुकीचं एकंदर चित्र पाहिलं तर उद्या तेजस्वी यादव बहुमताने बिहारचे मुख्यमंत्री झाले तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. कारण लोकभावना महत्त्वाची असते. ती दाबता येत नाही”, असं राऊत म्हणाले.
“बिहारची जशी लोकभावना आता आपल्याला दिसून येते तेच महाराष्ट्रात झालं, तेच आता इतर राज्यांत होईल”, असं सूचक विधान करत बिहारमध्ये नॉन भाजप सरकार बनेल, असंच राऊत यांनी सूचित केलं.
“जर निवडणुकीमध्ये गडबड झाली नाही, म्हणजे लोकांच्या मनात शंका असते. तशी जर गडबड झाली नाही तर बिहारमध्ये पूर्ण बहुमताने तेजस्वी यादव मुख्यमंत्री झाले तर आश्चर्य वाटणार नाही. बिहारच्या निवडणुकीकडे सगळ्या देशाचं नाही जगाचं लक्ष लागलंय”, असं राऊत म्हणाले.
ठाकरे सरकार कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या पण…., राऊतांचा टोला
ठाकरे सरकार कोसळेल, अशा पैजा महाराष्ट्रात लागल्या होत्या; पण सरकार पूर्ण ताकतीने चालतंय आणि चालेल, असं म्हणत संजय राऊतांनी विरोधकांना टोला लगावला. युतीचे सरकार होते तेव्हा पण बाळासाहेब ठाकरे हे सरकार चालवतायत, असाच आरोप केला जात होतो, आता जेव्हा तीन पक्षांचे सरकार आहे, तेव्हा सरकारमधील ज्येष्ठ नेते शरद पवार मार्गदर्शन करत आहेत, तिकडे मोदी पण इतर राज्यांना मार्गदर्शन करत असतात, सल्ला देतात, सरकार जर शरद पवारांचा सल्ला घेत असेल तर कुणाला पोटदुखी का होतेय, असा सवालही राऊतांनी उपस्थित केला आहे.
(Sanjay Raut On Bihar Election And Tejashwi yadav)
संबंधित बातम्या
बाळासाहेबांच्या काळात राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबईत होता, आता पुण्यात; राऊतांचं सूचक विधान