जे शिवरायांचे शत्रू देखील करू शकले नाहीत, ते भाजपने केलं, केसरकरांना जोड्याने मारा; राऊतांनी सरकारला घेरलं

| Updated on: Aug 28, 2024 | 10:16 AM

Sanjay Raut on Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed in Malvan : मालवणमध्ये असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. त्यावरून राजकारण तापलं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारला घेरलंय. राऊत काय म्हणाले? वाचा सविस्तर बातमी....

जे शिवरायांचे शत्रू देखील करू शकले नाहीत, ते भाजपने केलं, केसरकरांना जोड्याने मारा; राऊतांनी सरकारला घेरलं
राऊतांनी सरकारला घेरलं
Follow us on

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता. मात्र तो अवघ्या आठ महिन्यात कोसळला. यावरून विरोधकांनी सरकारला घेरलं आहे. जे शिवरायांचे शत्रू देखील करू शकले नाहीत, ते भाजपने केलं, असं म्हणत संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधला आहे. पुतळा पडला बरं झालं असं म्हणणारा मंत्री फडणवीसांसोबत काम करत आहे. ही शिंदेंची गँग आहे. फडणवीस त्यांची वाहवा करत आहे. त्या मंत्र्याला बुट मारलं पाहिजे. फडणवीस सच्चे शिवभक्त असतील तर त्यांनी केसकरला बुटाने मारलं पाहिजे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाकडून चौकशी करा, असं संजय राऊत म्हणालेत.

संजय राऊतांचा सरकारवर निशाणा

पाण्यात असंख्य पुतळे आहेत. शिखरावर आहेत. पहाडावर आहे. प्रतापगडावर आहे. १२० ते ६०० किलोमीटर वेगाने प्रतापगडावर वारे वाहत आहे. नेहरुंनी, शाहू महाराजांनी स्थापना केलेले पुतळे तसेच आहेत. पण सात महिन्यांपूर्वीचे पुतळा पडला. वाऱ्याने पुतळा पडला. किल्ल्याच्या बाजूला नारळी पोफळीची झाडे आहे. लोकांची घरे आहेत. पत्रे पडली नाही. झाडे पडली नाही. वादळात झाडे आणि पत्रे उडतात. तसे काही दिसलं नाही, असं संजय राऊत म्हणाले.

पुतळा पडला कारण पुतळा पोकळ होता. भ्रष्टाचार झाला होता. पुतळा पडला त्याचं कारण ठाणे कनेक्शन आहे. मुख्यमंत्र्यांच्या पुत्राचं कनेक्शन आहे. मी सांगत नाही. बातम्या सांगत आहेत. त्यावर खरं तर विद्यमान न्यायमूर्तीच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करा. चौकशी करा,  अशी मागणीही संजय राऊतांनी केलीय.

२० तारखेला मी जाणार आहे. राज्यभरातील लोक येणार आहे. महाराष्ट्राच्या मनाला झालेली ही जखम आहे. अशा लोकांना बुटाने मारलं पाहिजे., त्या माणसाला वाटत असेल महाराजांचा पुतळा पडला हे बरं झालं. त्यातून चांगलं होईल. काही अफजल खानाची औलाद आहे. ही माणसं मिंध्यांनी पोसली आहे. हे लोक त्यांच्या मंत्रिमंडळात आहे. हे सडक्या विचाराचे लोक आमच्याकडून गेले बरं झालं. यांच्या तोंडातून हे शब्द कसे निघू शकतात. बरं झालं पुतळा पडला, त्यातून शुभ शकून घडेल असं म्हणणारी माणसं कशी असू शकतात. हे फडणवीसांचं पाप आहे. महाराजांचा पुतळा पैसे खाण्यासाठी पाडला हा आरोप नाही सत्य आहे, असं म्हणत दीपक केसरकरांवर संजय राऊतांनी टीका केली आहे.