एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार?; शिवसेनेच्या नेत्याचं मोठं विधान, म्हणाले, आमच्या दाढीवाल्यामध्ये…

Sanjay Shirsat on Eknath Shinde : शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी सत्तास्थापनेबाबत महत्वाचं विधान केलं आहे. एकनाथ शिंदे यांचं नाव घेत संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलं आहे. तसंच महायुती सरकारच्या सत्तास्थापनेबाबतही शिरसाटांनी महत्वाची माहिती दिली आहे. वाचा सविस्तर...

एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार?; शिवसेनेच्या नेत्याचं मोठं विधान, म्हणाले, आमच्या दाढीवाल्यामध्ये...
एकनाथ शिंदे, मुख्यमंत्रीImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Dec 02, 2024 | 12:43 PM

राज्यात नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार? याबाबत चर्चा पाहायला मिळत आहे. तसंच जर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद दिलं गेलं नाही तर शिंदेंना उपमुख्यनमंत्रिपद किंवा केंद्रातील मंत्रिपदाची ऑफर दिली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे केंद्रात जाणार का? याबाबतच प्रश्न चिन्ह आहे. यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते, आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे हे दिल्लीच्या राजकारणात जाणार नाहीत, असं संजय शिरसाट यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.

एकनाथ शिंदे हे दिल्लीच्या राजकरणात जाणार नाहीत. शिंदेसाहेबांनी आमचं नेतृत्व करावं दिल्लीत जाऊ नये. महाराष्ट्रातील त्यांचा प्रभाव लोकप्रियत पाहता महाराष्ट्रात राहावं. काय मिळालं असतं काय मिळालं नसतं. हा भूतकाळ आहे, असं संजय शिरसाट म्हणालेत. आज तीन प्रमुख नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर दिल्लीतील नेत्यांशी व्हीसीद्वारे संवाद होईल अशी माहिती मिळतेय, असंही शिरसाटांनी सांगितलं आहे.

सत्तास्थापनेबाबत संजय शिरसाट काय म्हणाले?

महायुतीचं सरकार केव्हा स्थापन होणार याचा खुलासा झालेला आहे. लग्नघटिका जवळ आली आहे. काही वराती नाचण्याच्या मूडमध्ये आहेत. काहीजण एकनाथ शिंदे नाराज, अजित दादा पवार नाराज अशी चर्चा करत आहेत. मात्र महायुती मजबूत आहेविरोधीपक्षाच्या नेत्यांनाही शपथविधीचं निमंत्रण दिलं जाईल. त्यांनी यावं आणि या भव्य उत्सवात सहभागी व्हावं. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

संजय राऊतांवर निशाणा

ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत शिंदेगटावर वारंवार निशाणा साधताना दिसतात. त्यांच्या या टीकेला शिरसाटांनी प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊतांना दाढीची चांगलीच कल्पना आहे. हेच संजय राऊत राज्यसभेवेळी शिंदेंचे पाय धरत होते. दाढीला हलक्यात घेऊ नका. राज्यसभेवेळी खरतच शिंदेंची ती झालेली चूक आहे. शिंदेंनी दाढीवर हात फिरवला तर महागात पडेल. राज्यसभेवर या संजय राऊतला पाठवायला नको होतं. याने तिथे जाऊन पक्षाचं वाटोळं केलं, अशा शब्दात संजय शिरसांनी टीकास्त्र डागलं आहे.

फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.
गृहमंत्रीपदावरून राज्याचं सरकार अधांतरी लटकतंय, हे कसलं मजबूत सरकार ?
गृहमंत्रीपदावरून राज्याचं सरकार अधांतरी लटकतंय, हे कसलं मजबूत सरकार ?.
राज कुंद्राला समन्स, आज ईडीसमोर हजेरी
राज कुंद्राला समन्स, आज ईडीसमोर हजेरी.
'शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांना मांत्रिकाची गरज अन्..', राऊतांचा टोला
'शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांना मांत्रिकाची गरज अन्..', राऊतांचा टोला.
काठावर पास होणाऱ्या मुलानं बोलणं योग्य नाही, शिरसाट यांचा कोणाला टोला?
काठावर पास होणाऱ्या मुलानं बोलणं योग्य नाही, शिरसाट यांचा कोणाला टोला?.
शिंदे अचानक दरेगावला, विरोधकांच्या टीकेवर म्हणाले, 'असा कोणता नियम...'
शिंदे अचानक दरेगावला, विरोधकांच्या टीकेवर म्हणाले, 'असा कोणता नियम...'.
विधानसभेच्या पराभवानंतर मनसे नेत्याचा राजीनामा, राज यांना पाठवलं पत्र
विधानसभेच्या पराभवानंतर मनसे नेत्याचा राजीनामा, राज यांना पाठवलं पत्र.
येत्या 5 डिसेंबरला फडणवीस सरकारच्या शपथविधीला मोदींसह कोण-कोण येणार?
येत्या 5 डिसेंबरला फडणवीस सरकारच्या शपथविधीला मोदींसह कोण-कोण येणार?.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार 'ही' ९ मंत्रिपदं, गृहखातं असणार?
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार 'ही' ९ मंत्रिपदं, गृहखातं असणार?.