शरद पवारांनी गुगली टाकली अन् त्याचमुळे ठाकरे गट…; शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
Sanjay Shirsat on Sharad Pawar Shivsena Uddhav Thackeray Group : शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी शरद पवार यांच्याबाबत एक मोठं विधान केलं आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचाही त्यांनी उल्लेख केला आहे. संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...
शिवसेना शिंदे गटाचे नेते, आमदार संजय शिरसाट यांनी शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाबाबत एक वक्तव्य केलं आहे. शरद पवारांनी ठाकरे गटाला आपलंस केलंय. त्याला कारणीभूत संजय राऊत आहेत. शरद पवारांना शिवसेना संपवायची आहे. त्यासााठीच ते एव्हढे ॲक्टिव्ह आहेत. अमित शाह हेच सांगत आहेत की, शरद पवारांनी जी गुगली टाकली, त्यामुळे आज ठाकरे गटाची ही अवस्था झाली आहे, असं संजय शिरसाट म्हणालेत. ते मुंबईत माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी महायुतीबाबतही त्यांनी महत्वाचं विधान केलं आहे.
महायुतीबाबत काय म्हणाले?
आमच्याकडे असलेल्या जागा आणि अजितदादांकडे असलेल्या जागा वाटप सन्मानजनक होईल. गजानन किर्तीकर यांच्या वक्तव्यांनी शिवसैनिक देखील नाराज आहे. निकाला नंतर एकनाथ शिंदेसाहेब आणि किर्तीकर साहेब भेटतील आणि निर्णय घेतील. शिवसेना आणि भाजप युती मजबूत आहे मुख्यमंत्री कुठे ही बदलले जाणार नाहीत. मुख्यमंत्री खंबीर आहेत. 24/7 काम करणारा हा मुख्यमंत्री आहेत. मराठा आंदोलन असो किंवा ओबीसी आंदोलन असो ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या समर्थपणे सांभाळली, असंही संजय शिरसाट म्हणाले.
पुण्यातील अपघात प्रकरणावर प्रतिक्रिया
पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील कल्याणीनगर भागात पोर्शे कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील तरूण-तरूणीचा मृत्यू झाला. या प्रकरणात वेगवेगळे अपडेट्स समोर येत आहेत. यावर संजय शिरसाटांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुणे हीट अँड रन प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. जनतेचा संताप पाहून राजकारण देखील तापलंय…. त्यामुळे पोलिसांवर देखील दबाव आहे. त्यामुळे विरोधक ज्या प्रकारे आरोप करत आहेत. त्यामुळे संभ्रम निर्माण करत आहेत, असं ते म्हणाले.
पल्लवी सापळे यांच्या संदर्भात आरोप असतील. तर त्याची चौकशी होणं आवश्यक आहे. पण ती व्यक्ती जर सक्षम असेल तर त्यांची चौकशी करण्यासाठी नियुक्ती केली असेल. आरोप करणं आणि तो सिद्ध होणं यात अंतर आहे, असं म्हणत संजय शिरसाट यांनी पुणे अपघात प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.