पंढरपुरात संजीवन समाधी सोहळ्याचा उत्साह, भक्तांच्या भेटीला साक्षात श्री. विठ्ठल!

आषाढी यात्रेला सर्वच संतांच्या पादुका श्री. विठ्ठल भेटीला येत असतात. (Sanjeevan Samadhi Ceremony Started In Pandharpur) 

पंढरपुरात संजीवन समाधी सोहळ्याचा उत्साह, भक्तांच्या भेटीला साक्षात श्री. विठ्ठल!
Follow us
| Updated on: Dec 11, 2020 | 10:31 AM

पंढरपूर : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळयासाठी आज पंढरपुरातून साक्षात श्री. विठ्ठलाने आळंदीकडे प्रस्थान ठेवले. श्री विठ्ठला समवेत भक्त पुंडलिक आणि संत नामदेव यांच्याही पादुकांचे प्रस्थान आळंदीकडे झाले. आषाढी यात्रेला सर्वच संतांच्या पादुका श्री. विठ्ठल भेटीला येत असतात. (Sanjeevan Samadhi Ceremony Started In Pandharpur)

मात्र कार्तिक वैद्य एकादशी आणि त्यानंतर होणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी साक्षात श्री विठूराया उपस्थित होते, असा संत नामदेवराय यांच्या अभंगात उल्लेख आहे. त्यामुळे प्रतिवर्षी श्री विठ्ठलाच्या पादुका संजीवन समाधी सोहळ्यासाठी प्रस्थान करत असतात.

एसटी महामंडळाच्या फुलांनी आकर्षकपणे सजवलेल्या बसमधून 20 वारकऱ्यांसह श्री. विठ्ठलाच्या पादुकांचे आज सकाळी 9 वाजता प्रस्थान झाले. सकाळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पादुकाची मंदिर समितीने व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते विधीवत पूजा झाली. त्यानंतर विठू नामाच्या जयघोषात पादुकांनी बसमधून प्रस्थान केले.

या बरोबरच संत नामदेव आणि भक्त पुंडलिक यांच्याही पादुका आज एसटी बसमधून आळंदीकडे मार्गस्थ झाल्या. यावर्षी कोरोना संकटामुळे सर्व धार्मिक कार्यक्रम आणि यात्रांवर प्रतिबंध करण्यात आला आहे. प्रतिकात्मक पध्दतीने सोहळे साजरे केले जात आहेत. त्यामुळे शासन नियमानुसार आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या 20 वारकऱ्यांसह विठ्ठलाच्या पादुका फुलांनी सजवलेल्या बसमधून आळंदीकडे मार्गस्थ झाल्या आहेत.  (Sanjeevan Samadhi Ceremony Started In Pandharpur)

संजीवन समाधीला आळंदीत सुरुवात

आळंदीत 724 व्या संजीवन समाधीला सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आळंदीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. येत्या 11 डिसेंबरला कार्तिकी एकादशी तर 13 डिसेंबरला संजीवन समाधी सोहळा आहे.

या सोहळ्याच्या निमित्ताने दरवर्षी राज्यातून चार ते पाच लाख भाविक संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर माथा टेकवायला येत असतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि मंदिर प्रशासनाने संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रशासनाने 6 ते 14 डिसेंबर दरम्यान संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे यंदाचा संजीवन समाधी सोहळ्याचा हा सप्ताह कमीत कमी 20 ते जास्तीत जास्त 50 वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. (Sanjeevan Samadhi Ceremony Started In Pandharpur)

संबंधित बातम्या : 

सोमवती यात्रेनिमित्त सोन्याच्या जेजुरीत जमावबंदी; 12 ते 14 डिसेंबरपर्यंत भाविकांसाठी बंद

724 व्या संजीवन समाधीला आळंदीत सुरुवात, 9 दिवस संचारबंदी लागू

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.