SARI : औरंगाबादेत कोरोनासह सारीचं थैमान, 13 जणांचा मृत्यू, सारीच्या रुग्णांची संख्या 100 वर

औरंगाबाद शहरात मात्र सारी या नव्या आजाराने थैमान घातलं आहे. या आजारामुळे आतापर्यंत जवळपास 13 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे

SARI : औरंगाबादेत कोरोनासह सारीचं थैमान, 13 जणांचा मृत्यू, सारीच्या रुग्णांची संख्या 100 वर
Follow us
| Updated on: Apr 18, 2020 | 1:21 PM

औरंगाबाद : जगभरात सध्या कोरोना विषाणूने (Sari Infection In Aurangabad) धुमाकूळ घातला आहे. मात्र तिकडे औरंगाबाद शहरात सारी या आजाराने थैमान घातलं आहे. या आजारामुळे आतापर्यंत जवळपास 13 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर अजूनही शंभरपेक्षा जास्त (Sari Infection In Aurangabad) रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

या आजारामुळे फक्त औरंगाबादच नाही, तर संपूर्ण राज्यासमोर एक नवं संकट उभं ठाकलं आहे. या आजाराचे रुग्ण औरंगाबाद, जालना, नाशिक सोलापूर आणि मुंबईतही आढळू लागले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे.

‘सारी’ आजार नेमका काय?

सारी हा आजार फ्लू वर्गातील असून सर्दी, खोकला, ताप अशक्तपणा ही आजाराची लक्षणे आहेत. प्रथमदर्शनी हा आजार कोरोना सदृश्य असला, तरी या आजारातील रुग्णांची ‘कोविड-19’ टेस्ट निगेटिव्ह येते. मात्र, याची लक्षणे तीव्र असल्यामुळे या आजारात रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते.

‘सिव्हेअर अॅक्यूट रेस्परेटरी इन्फेक्शन’ (Severe acute respiratory syndrome) असं सारीचं पूर्ण नाव. या आजारात सुरुवातीला सर्दी-खोकला त्यानंतर ताप आणि नंतर कमालीचा अशक्तपणा येतो. त्यानंतर इन्फेक्शन आटोक्यात नाही आलं, तर रुग्णाचा मृत्यू होतो. सध्या शंभर रुग्णांमागे 13 जणांचा मृत्यू होत झाल्याने, प्रथमदर्शनी या आजाराच्या मृत्यूचे प्रमाण 13 टक्के आहे, अस समजावं लागेल. हे प्रमाण खूप (Sari Infection In Aurangabad) गंभीर स्वरुपाचे आहे.

‘सारी’ आजाराची लक्षणं काय?

या आजारात प्रामुख्याने रुग्णाला श्वास घेण्यास भयंकर त्रास होतो. रुग्ण अगदी जीभ काढून धापा टाकाव्यात तशा टाकतो आणि त्यात ताप अशक्तपणा आणि इतर त्रास होत असल्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण जास्त आहे.

काहींच्या मते सारी हा आजार नाही, असं सांगितलं जातं. मात्र, औरंगाबाद शहरातील वैद्यकीय अधिकारी सारी हा आजार पूर्वीपासून असल्याचं सांगत आहेत. सध्या कोरोनामुळे सारी हा आजार पुढे आला आहे. इतकंच नाही तर, डेंग्यू, मलेरिया सारखाच हाही आजार पूर्वीपासून आहे. पूर्वीही या आजारामुळे मृत्यू होत होतेच, पण सध्या कोरोनामुळे या आजाराकडे विशेष लक्ष गेल्याचं डॉक्टर सांगत आहेत.

एकीकडे, कोरोना विरोधात लढण्यासाठी आरोग्य यंत्रणेची दमझाक सुरु आहे आणि त्यातच आता सारी या आजाराने गंभीर स्वरुप धारण केल्यामुळे महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा आणखीनच तणावाखाली येण्याची शक्यता आहे.

औरंगाबादेत कोरोनाबाधितांचा आकडा 29 वर

औरंगाबादेत आणखी एक करोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. एका 15 वर्षीय मुलाला करोनाची लागण झाली आहे. यापूर्वी अढळलेल्या 17 वर्षीय मुलाच्या भावाला आता कोरोना झाला आहे. कोरोनाबाधित 15 वर्षीय मुलाला उपचारासाठी मिनी घाटीत दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक सुंदर कुलकर्णी यांनी दिली. त्यामुळे, औरंगाबादेत कोरोना बधितांचा आकडा आता 29 वर पोहोचला आहे.

Sari Infection In Aurangabad

संबंधित बातम्या :

Corona | राज्यात दिवसभरात 31 रुग्णांची कोरोनावर मात, बाधितांची संख्या 3320 वर

पुण्यात 580 जणांना कोरोना संसर्ग, 47 जणांचा मृत्यू, हॉटस्पॉट ठरलेल्या भवानी पेठेसह कोठे किती रुग्ण?

Lockdown 2 : शेती, डिजीटल व्यवहार, आयटी सेवा सशर्त सुरु, 20 एप्रिलपासून काय काय सुरु होऊ शकतं?

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.