साताऱ्यात घरात झोपलेल्या 8 महिन्यांच्या बाळाचे अपहरण, दुचाकीवरुन आलेल्या जोडप्यावर संशय
लहान बाळाचे अपहरण झाल्याने काळज परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात जोडप्याने बालकाचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातल्या काळज गावात घरातून झोपलेल्या (Sleeping Baby Kidnapped From Home) लहान बाळाचे अपहरण झाल्याने काळज परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात जोडप्याने बालकाचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. लोणंद पोलीस सध्या या बाळाचा शोध घेत आहेत (Sleeping Baby Kidnapped From Home).
फलटण तालुक्यात धक्कादायक प्रकार घडला असून त्रिंबक दत्तात्रय भगत यांच्या 8 महिन्याच्या मुलाचे अपहरण झाले आहे. ते आपल्या कुटुंबासह काळज येथे राहतात. विशेष म्हणजे त्यांना 4 मुली आणि ओमकार नावाचा एकुलता एक मुलगा आहे. कुटुंबातील व्यक्ती शेतामध्ये कामासाठी गेल्याने घरात कोणी नसल्याचा फायदा घेत अनोळखी व्यक्तीने घरात घुसून झोपलेल्या अवस्थेतील 8 महिन्याच्या ओमकारचे अपहरण अज्ञात व्यक्तींनी केला आहे.
हा सर्व प्रकार त्रिंबक भगत यांच्या मोठ्या मुलीने पाहून आरडा ओरडा केला. मात्र, तोपर्यंत अज्ञात व्यक्ती बाळाला घेऊन पसार झाली होती. अपहरणकर्त्यांचे अंदाजे वय 22 ते 25 वर्षे अंगावरती काळा शर्ट आणि जीन्स आणि त्याच्यासोबत असणारी महिला गुलाबी रंगाचा साडी किंवा ड्रेस घातलेल्या व्यक्तींवर संशय व्यक्त केला जात आहे. ते दोघे दुचाकीवरुन पसार झाल्याचे स्थानिक ग्रामस्थांकडून बोलले जात आहे.
या घटनेमुळे फलटण तालुक्यासह काळज येथे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास लोणंद पोलीस ठाण्यामध्ये संपर्क साधावा, असे आवाहन सातारा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी केले आहे.
लॉकडाऊनमध्ये आश्रय, नवी मुंबईत अल्पवयीन मुलगा सोन्याच्या दागिन्यांसह पसारhttps://t.co/3RwY2TJrW3
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 30, 2020
Sleeping Baby Kidnapped From Home
संबंधित बातम्या :
बायकोशी भांडण, जिलेटीनची कांडी तोंडात पकडून स्फोट, डोक्याच्या चिंधड्या
अहमदनगरमध्ये तक्रारदार महिलेवरच बंदुकीचा धाक दाखवत बलात्काराचा आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल