अंतर्गत गुण चुकवणे कॉलेज-प्राध्यापकांना ‘महागात’ पडणार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आकारणार दंड

अंतर्गत गुणांसंदर्भात तीनपेक्षा जास्त वेळेस त्रुटी आढळून आल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई होणार, असा इशाराही देण्यात आला आहे.

अंतर्गत गुण चुकवणे कॉलेज-प्राध्यापकांना 'महागात' पडणार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आकारणार दंड
Follow us
| Updated on: Aug 10, 2020 | 7:49 AM

पुणे : परीक्षांच्या अंतर्गत गुणांमध्ये त्रुटी आढळल्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील महाविद्यालय आणि प्राध्यापकांना भुर्दंड पडणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामागे एक हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. (Savitribai Phule Pune University to impose fine for mistakes in internal assessment)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध परीक्षांच्या अंतर्गत गुणांत त्रुटी आढळल्यास महाविद्यालय आणि संबंधित प्राध्यापकांना संयुक्‍तपणे प्रति विद्यार्थी एक हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने घेतला आहे.

अंतर्गत गुणांसंदर्भात तीनपेक्षा जास्त वेळेस त्रुटी आढळून आल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई होणार, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे आता शिक्षक व महाविद्यालयांना योग्य पद्धतीने अंतर्गत गुण भरताना अधिक दक्ष राहणे आवश्‍यक आहे.

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी या संबंधीचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

मार्क्स दिल्यावर त्यावर स्वाक्षरी करताना संबंधित प्राध्यापकांनी ‘वरील सर्व गुण मी पूर्णपणे वाचले असून ते बरोबर असल्याची खात्री केलेली आहे’, असे हमीपत्र देणे आवश्‍यक आहे. त्याचप्रमाणे सदर हमीपत्रावर महाविद्यालयाच्या प्राचार्यांची स्वाक्षरी बंधनकारक असेल.

विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण योग्य पद्धतीने भरण्याची संपूर्ण जबाबदारी संयुक्‍तपणे विषय प्राध्यापक व महाविद्यालयांची असेल. त्यात त्रुटी निदर्शनास आल्यास दंड आकारला जाणार आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

दरम्यान, काही विद्यार्थी परीक्षा फी भरु शकले नसल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अनेक महाविद्यालयांचे संपूर्ण निकालच अडवल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी समोर आला होता. पदवीचे शेकडो विद्यार्थी निकालाच्या प्रतिक्षेत आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने अनेक महाविद्यालयांतील पदवीच्या प्रथम आणि द्वितीय वर्षातील सर्वच विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवल्याची माहिती आहे.

विद्यापीठाने पदवीच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षेसाठी शुल्क भरण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना दिल्या होत्या. कोरोनामुळे परीक्षा शुल्क भरण्यास वेळोवेळी मुदतवाढही देण्यात आली आहे. त्याच दरम्यान कोरोनामुळे अंतिम वर्ष वगळता सर्व विद्यार्थ्यांचे निकाल मागील गुणांवरून निकाल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी शुल्कच भरले नाही, असं सांगितलं जात आहे.

संबंधित बातम्या :

काही विद्यार्थ्यी फी भरु शकले नाही, पुणे विद्यापीठाने अनेक महाविद्यालयांंचे संपूर्ण निकालच अडवले

घरात दुसरा मोबाईल पडून आहे? विद्यार्थ्यांसाठी दान करा, पुणे झेडपीचा भन्नाट उपक्रम

(Savitribai Phule Pune University to impose fine for mistakes in internal assessment)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.