देशातील प्रत्येक नागरिक लखपती होणार, या बँकेने आणलीय जबरदस्त योजना

देशाची सर्वात मोठी सरकार बँकेने दोन नवीन योजना जाहीर केलेल्या आहेत. एक योजना रिकरिंग डिपॉझिट्स योजना आहे. या योजनेचे नाव 'हर घर लखपती' असे आहे. दुसऱ्या योजनेचे नाव एसबीआय पॅट्रंस असे आहे. ही योजना सिनियर सिटीझनसाठी आहे. ही एक एफडी स्कीम आहे. काय आहे या दोन्ही योजनांची वैशिष्ट्ये पाहूयात....

देशातील प्रत्येक नागरिक लखपती होणार, या बँकेने आणलीय जबरदस्त योजना
Indian currency
Follow us
| Updated on: Jan 04, 2025 | 1:13 PM

देशातील आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या एसबीआयने प्रत्येक नागरिकाला लखपती बनविण्याची योजना आणली आहे. भारतीय स्टेट बँकने ( SBI Bank )  ‘हर घर लखपती’ नावाची डिपॉझिट स्कीम आणली आहे तर आणि  ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘एसबीआय पॅट्रन्स’ नावाची योजना आणली आहे. एसबीआयच्या प्रसिद्धी पत्रकानुसार ‘हर घर लखपती’ ही एक प्री कॅलक्युलेट केलेली रिकरिंग डिपॉझिट्स स्किम आहे. ज्यात ग्राहकांना एक लाख रुपये किंवा त्या रकमेच्या गुणोत्तर रक्कम डिपॉझिट करण्यासाठी सोय आहे. या योजनेचा फायदा १८ वयाच्या आतील व्यक्ती देखील घेऊ शकतात. त्यामुळे मुलांना सुरुवातीपासून बचतीची सवय लागते.

 ‘एसबीआय पॅट्रंस’

एसबीआयने निवडणक ज्येष्ठ नागरिकांनासाठी ‘एसबीआय पॅट्रंस’ देखील लाँच केली आहे. ही योजना ८० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी खास तयार केलेली एक स्पेशल एफडी स्कीम आहे. नवीन एसबीआय योजना बँकेसोबत अनेक वर्षांचे संबंध असणाऱ्या वयस्कांसाठीची योजना असून त्यांना खास वाढीव व्याज दिले जाणार आहे. ‘एसबीआय पॅट्रंस’ सध्याच्या आणि नवीन दोन्ही एफडी गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध आहे.

आमचे ध्यैय ओरिएंटेटिड डिपॉझिट प्रोडक्ट तयार करणे हे आहे. त्यामुळे केवळ आर्थिक रिटर्न वाढेल शिवाय आमच्या ग्राहकांच्या इच्छेनुरुप हे असेल. आम्ही पारंपारिक बँकींग अधिक समावेशक आणि प्रभावशाली करण्यासाठी याला पुन्हा परिभाषित करीत आहे. एसबीआयमध्ये आम्ही प्रत्येक ग्राहकाला सशक्त बनविण्यासाठी इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजीचा लाभ उठविण्यासाठी प्रतिबद्धीत आहोत. आम्ही २०४७ पर्यंत भारताला एक विकसित राष्ट्र बनविण्याच्या विकास यात्रेत योगदान देण्यासाठी वित्तीय समावेशन आणि सशक्तीकरणास प्रोत्साहन देण्यासाठी प्रतिबद्ध आहोत असे भारतीय स्टेट बँकेचे अध्यक्ष सीएस सेट्टी यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

एसबीआयच्या सध्या एफडी योजनेचे व्याज नेमके किती आहे.

एफडीची काल मर्यादा ज्येष्ठांसाठी सध्याचे व्याज दर
7 दिवस ते 45 दिवसांपर्यंत 4 टक्के
46 ते 179 दिवसांपर्यंत 6 टक्के
180 ते 210 दिवसांपर्यंत 6.75 टक्के
211 ते 1 दिवसांपर्यंत 7 टक्के
1 ते 2 वर्षांच्या आत 7.30 टक्के
2 वर्षे ते 3 वर्षांच्या आत 7.50 टक्के
3 ते 5 वर्षांच्या आत 7.25 टक्के
5 ते 10 वर्षांच्या आत 7 टक्के

ज्येष्ठ नागरिकांसाठी एफडी स्कीम

एसबीआयने आपल्या ग्राहकांसाठी हाय एफडी रेट्स ऑफर करीत दूसरी डिपॉझिट स्कीम सुरु झाली आहे. उदाहरणासाठी एसबीआय व्ही-केअर डिपॉझिट्स स्कीम सिनिअर सिटीजन्सला ५ वर्षे ते १० वर्षांच्या कमी अवधी कालावधीसाठी ७.५० टक्के व्याज प्रदान करीत आहे. त्याच प्रकारे एसबीआय ४४४ दिवसांच्या एफडी योजना ( अमृत वृष्टी ) सिनिअर सिटीजनला ७.७५ टक्के व्याज देत आहे.ही योजना ३१ मार्च २०२५ पर्यंत उपलब्ध आहे. एसबीआय अमृत कलश योजनेत ४०० दिवसांची एफडी योजनेत ज्येष् नागरिकांना ७.५० टक्के व्याज मिळत आहे. ही योजना ३१ मार्च २-२५ पर्यंत उपलब्ध आहे.

एसबीआय आरडी अकाऊंटच्या अटी आणि शर्थी

जर एखादा व्यक्ती किमान १२ महिने आणि कमाल १२० महिन्यांच्या काळासाठी एसबीआयमध्ये आरडी खाते उघडू शकतो. एसबीआयमध्ये आरडी अकाऊंटमध्ये किमान १०० रुपये प्रति महिना जमा करण्यासह खोलता येते. आरडी खात्यात उशीरा रक्कम जमा केल्यास दंड लागू शकतो. जर सहा हप्ते चुकले तर आरडी खाते वेळेआधी बंद केले जाईल आणि खातेधारकाला शिल्लक रक्कम दिली जाईल असे एसबीआयच्या वेबसाईटवर म्हटले आहे.

बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.