School Reopen | …तर दिवाळीनंतरही शाळा सुरु करणं शक्य नाही : बच्चू कडू
इतर मागण्यांचा चौफेर विचार करु, कारण हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे," असे बच्चू कडू यांनी सांगितले. (Bacchu Kadu on School Reopen)
अमरावती : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील सर्वच शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात आल्या आहेत. दिवाळीनंतर शाळा सुरु करता येतील का याची चाचपणी सध्या सुरु आहे. मात्र “जर दिवाळीनंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच राहिला तर शाळा सुरु करणं शक्य नाही,” असं मत शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केलं. (Bacchu Kadu on School Reopen)
कोरोनाची लस आल्याशिवाय शाळा, महाविद्यालय सुरु करु नका, अशी मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली होती. त्यावर अमरावतीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.
“शाळा सुरु करण्याबाबत प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत. कपिल पाटील यांनी त्यांचा विचार मांडला असेल. आपण सर्वांच्या पत्राचा तसेच इतर मागण्यांचा चौफेर विचार करु, कारण हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे,” असे बच्चू कडू यांनी सांगितले.
“दरम्यान काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी दिवाळीनंतर कोरोनाचे नियम पाळून शाळा सुरु करण्याचे संकेत दिले होते. आधी आपण ऑगस्ट, सप्टेंबर आणि आता दिवाळीनंतर शाळा सुरू करता येईल का, याचा विचार करत होतो. मात्र, राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. जर दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट आली, संक्रमण वाढले तर आपल्याला दिवाळीनंतरही शाळा बंद ठेवाव्या लागणार आहेत,” असे बच्चू कडू यांनी सांगितले. (Bacchu Kadu on School Reopen)
संबंधित बातम्या :
जानेवारीपासून शाळा, उन्हाळ्याची सुट्टी रद्द, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडूंचा प्रस्ताव
आधी बोगस बियाणे, आता पिकांवर रोग, राज्यातील कृषी खातं झोपलं आहे का?, बच्चू कडूंचा सरकारला सवाल