Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यवतमाळमध्ये कोरोनाच्या सावटाखाली शाळा सुरु; विद्यार्थ्यांना पालकांचे संमतीपत्रक बंधनकारक

कोरोनाच्या सावटाखाली राज्यातील 36 पैकी 14 जिल्ह्यांमधील शाळेची दारं विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात आली. त्यानुसार नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग भरवण्यात आले. पहिल्या दिवशी राज्यभरात 88 हजार विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली.

यवतमाळमध्ये कोरोनाच्या सावटाखाली शाळा सुरु; विद्यार्थ्यांना पालकांचे संमतीपत्रक बंधनकारक
Follow us
| Updated on: Nov 24, 2020 | 7:01 AM

यवतमाळ : कोरोना संकट (Corona Pandemic) आणि लॉकडाऊमुळे (Lockdown) बंद असलेल्या शाळा अखेर कालपासून (23 नोव्हेंबर) सुरु (Schools Started) झाल्या आहेत. ठाकरे सरकारने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सोमवारी 36 पैकी 14 जिल्ह्यांमधील शाळेची दारं विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात आली. त्यानुसार नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग भरवण्यात आले. पहिल्या दिवशी राज्यभरात 88 हजार विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली. ज्या 14 जिल्ह्यांमध्ये शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामध्ये यवतमाळचाही (Yavatmal) समावेश आहे. जिल्ह्यात जवळपास 600 हून अधिक शाळा उघडण्यात आल्या आहेत. (School started in Yavatmal under the condition of Corona, Parental consent is mandatory for students to enter the school)

दरम्यान, विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांचे संमतीपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. पालकांची संमती असेल तरच विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता बहुतांश पालकांनी हे संमतीपत्र दिले नसल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात आले आहे.

यवतमाळमधील शिक्षकांची संख्या 3 हजार 397 इतकी असून त्यापैकी 2 हजार 600 शिक्षकांची तपासणी करण्यात आली होती. यातील 81 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, शासनाच्या निर्देशानुसार कोरोनाच्या सावटाखाली शाळा सुरू झाल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळाले. शिक्षकांची आरोग्य तपसणी केली जात असून 81 शिक्षक कोरोनाबाधित आढळल्याने आपल्या पाल्यालादेखील कोरोनाची बाधा होऊ शकते, अशी धास्ती पालकांच्या मनात असल्याने पहिल्या दिवशी शाळांमध्ये खूपच कमी विद्यार्थ्यांची संख्या पाहायला मिळाली.

कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचे पालन

शाळा सुरू करण्यापूर्वी व सुरू झाल्यानंतर कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात ठेवून आरोग्य, स्वच्छता, सुरक्षा या बाबींना प्राधान्य देण्यात आले आहे. शाळांमध्ये सॅनिटायझर, पल्स मीटर आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केले जाणार आहे.

जिल्ह्यात 9 वी ते 12 वीचे एकूण 1 लाख 49 हजार 785 विद्यार्थी

यवतमाळमध्ये नगर परिषद, जिल्हा परिषद, शासकीय अनुदानित आणि विनाअनुदानित मिळून 771 शाळा असून 3855 वर्गखोल्या आहे. तर इयत्ता 9 वी आणि 10 वीचे एकूण 89 हजार 988 विद्यार्थी तर 11 वी आणि 12 वीचे एकूण 59 हजार 797 विद्यार्थी आहेत.

शाळा सुरु झाल्याने विद्यार्थी आनंदित

ऑनलाइन पद्धतीने शाळा सुरू होती, मात्र त्यात आम्हला फारसं कळत न्हवतं. आज शाळा सुरु झाली आहे. त्यामुळे फार छान वाटत आहे. अनेक मित्रांना गेल्या 8 महिन्यात भेटलो नव्हतो. या मित्रांची भेट झाल्याचाही आनंद आहे, अशा प्रतिक्रया विद्यार्थ्यांकडून मिळाल्या आहेत.

कोरोना परिस्थिती लक्षात घेऊनच आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळा सुरु होणार

कोरोना संसर्ग आणि उपायोजना लक्षात घेऊनच आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळा सुरु होतील, अशी माहिती राज्याचे आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी (K.C. Padvi) यांनी दिली आहे. पाडवी म्हणाले की,“नंदुरबार जिल्ह्यातील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळा 1 डिसेंबरनंतर सुरू होतील. हा निर्णय घेण्यात आला असला तरी शासकीय आश्रम शाळा सुरू करताना कोरोना परिस्थिती लक्षात घेऊनच पुढील निर्णय घेण्यात येईल. तसेच, शाळा सुरु करताना कोरोनासंदर्भात कोणत्या उपायोजना करण्यात आल्या आहेत याचाही आढावा घेतला जाईल. त्यानंतर शासकीय आश्रमशाळा सुरु करण्यात येतील, तसेच शाळा सुरु करण्यासाठी कुठल्याही प्रकारची घाई केली जाणार नाही.”

संबंधित बातम्या

मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगची खबरदारी, नगरमधल्या 350 शाळा सुरु

Ratnagiri | School Reopen | रत्नागिरीत शाळा सुरु करायला पालकांचा विरोध

School Teachers Corona | उस्मानाबोदत शाळा सुरु होण्याच्या पूर्वसंध्येला 15 शिक्षकांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह

(School started in Yavatmal under the condition of Corona, Parental consent is mandatory for students to enter the school)

वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, १४ तासांच्या चर्चेनंतर बील पास
वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, १४ तासांच्या चर्चेनंतर बील पास.
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.