Viral Video : विद्यार्थ्यांचा निव्वळ धुमाकूळ, गाण्याची क्रेझ असावी तर अशी, जळगावच्या गॅदरिंगमधला व्हिडीओ तुफान व्हायरल

या अहिराणी गाण्याची (Ahirani Song) क्रेझ सध्या इतकी वाढलीय की लग्न, वाढदिवस यांसारख्या कार्यक्रमांसह अगदी थेट शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांतही या गाण्याची क्रेझ पाहायला मिळत आहे.

Viral Video : विद्यार्थ्यांचा निव्वळ धुमाकूळ, गाण्याची क्रेझ असावी तर अशी, जळगावच्या गॅदरिंगमधला व्हिडीओ तुफान व्हायरल
Follow us
| Updated on: Jan 20, 2023 | 9:05 PM

जळगाव : अहिराणी भाषेतील ‘हाई झुमका वाली पोर’ (Hai Jhumka Wali Por) या गाण्याने खान्देशासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर (Social Media) या गाण्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे या गाण्यावरील अनेक रिल्स देखील व्हायरल होत आहेत. या अहिराणी गाण्याची क्रेझ सध्या इतकी वाढलीय की लग्न, वाढदिवस यांसारख्या कार्यक्रमांसह अगदी थेट शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांतही या गाण्याची क्रेझ पाहायला मिळत आहे. दरम्यान, अशाच एका शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांनी या गाण्यावर डान्स केलाय. मात्र हे गाणे सुरू होताच सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या अगदी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांपासून सर्वांनीच या गाण्यावर ठेका घेतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या गाण्याचा व्हिडीओ फेसबुकवर जितरत्न पटाईत या युजरने शेअर केलाय. जळगाव जिल्ह्यातील धरणगावर तालुक्यातील एका संबंधित व्हिडीओ आहे. धरणगावातील व्ही. बी. पाटील प्राथमिक विद्यामंदिर या शाळेच्या गॅदरिंगमधील हा व्हिडीओ आहे. यातील अहिराणी गाण्याने निव्वळ धुमाकूळ घातलाय. गॅदरिंगमध्ये लहान मुलं ऐकत नाही म्हणून शाळेने हे गाणंचं बंद केले तेव्हा मुलं गप्प बसली, अशी माहिती संबंधित व्हिडीओ फेसबुकवर शेअर करणारे जितरत्न पटाईत यांनी दिलीय.

जळगाव जिल्ह्याच्या युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अभिलाषा रोकडे यांनीदेखील संबंधित व्हिडीओ शेअर केलाय. “खान्देशी गीतांची आज वाढती लोकप्रियता पाहून मनाला खूप आनंद देऊन जाते. ही लोकप्रियता पाहता गाणे हे खान्देशातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात खान्देशी गीतांचा डंका वाजविला जात आहे. लग्न असो किंवा कुठलाही समारंभ खानदेशी गीतांशिवाय पूर्णच होत नाही. त्याचे ज्वलंत उदाहरण नुकत्याच झालेल्या धरणगाव येथील एका शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात”, असं अभिलाषा म्हणाल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ :

“सध्या चर्चेत असलेले हाई झुमका वाली पोर या खानदेशी गाण्यावरील प्रेम हे रंगमंचावरच नव्हे तर प्रेक्षकांमध्येही पाहायला मिळाली. बेधुंद नाचणारे विद्यार्थी स्नेहसंमेलनाचा मनमोकळेपणाने आनंद घेताना दिसत आहेत”, असंही अभिलाषा म्हणाल्या आहेत.

सध्याच्या घडीतलं सर्वात प्रसिद्ध अहिराणी गाणं – हाई झुमका वाली पोर

अहिराणी गाण्यांमध्ये सध्या लोकप्रिय आणि प्रसिद्ध झालेल्या गाण्यांमध्ये ‘हाई झुमका वाली पोर’ या गाण्याने खूप भाव खाललाय. खान्देशात वाढदिवसाचा कार्यक्रम असो, लग्न असो किंवा हळदीचा कार्यक्रम असो, कोणताही कार्यक्रम असो, हे गाणं नाही वाजलं तर त्या कार्यक्रमात मजाच नाही. विशेष म्हणजे फक्त अहिराणीच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशात या गाण्याचे चाहते आहेत. त्यामुळे अवघ्या महिन्याभरात लाखो प्रेक्षकांनी यूट्यूबवर हे गाणं पाहिलं आहे.

‘हाई झुमका वाली पोर’ हे गाणं विनोद कुमावत आणि गायक भैय्या मोरे या दोन तरुणांनी लिहिलंय. तसेच त्यांनीच हे गाणं तयार केलंय. या गाण्यात डान्स करणारा तरुण विनोद कुमावत आहे आणि हे गाणं भैय्या मोरे या तरुणाने गायलंय. भैय्या मोरेला हे गाणं गाण्यासाठी अंजना बर्लेकर या महिला गायिकेने साथ दिलीय. तर राणी कुमावत ही अभिनेत्री या गाण्यात विनोद कुमावत सोबत नृत्य करताना दिसत आहे.

या गाण्याने यूट्यूबवर प्रदर्शित झाल्यापासून आतापर्यंतच्या अवघ्या दोन महिन्यात तब्बल 30 मिलियन व्ह्यूज मिळवले आहेत. 1 मिलियन म्हणजे 10 लाख व्ह्यू होतात, याचाच अर्थ 60 मिलियन म्हणजे तब्बल 6 कोटी प्रेक्षकांनी अवघ्या दोन महिन्यात हे गाणं पाहिलं आणि ऐकलं आहे.

आता आपण गाण्याच्या बोलकडे येऊयात. आम्ही तुम्हाला या गाण्याचे बोल आणि त्याचा अर्थ थोडक्यात सांगणार आहोत.

अहिराणी भाषेतील गाण्याचे बोल:

हाई झुमका वाली पोर हाई नदी थडी ले चालनी नदी थडी ले चालनी हाई नदी थडी ले चालनी मना राघ्या वाघ्या नी जोडी पाणी प्यावाले ती थडी चालनी हाई झुमका वाली पोर हाई नदी थडी ले चालनी तीना नजरना तो असा घावस मला वाटाय तो मना डाव स आशी दखी दखी करू नको घायल थोडी नजर दे तुना प्यारणी हाई झुमका वाली पोर…

उनपडे तुना साडीवर पोर ऐशी का मना गाडी वर अशी टकमक काय मानमान मखडाई राहिणी हाई झुमका वाली पोर..

मस्तानी मन नाव स तूच मना बाजीराव स तुना सांगे मी येसु साजन माले करिले तू मनी साजणी हाई झुमका वाली पोर…

गाण्याचा मराठीत अर्थ

ही झुमकावाली पोर नदी तिरावरी चालली माझ्या राघ्या-वाघ्याची जोडी (बैलजोडी) पाणी प्यायला नदी तिरावर चालली

असं पाहून तू मला घायाळ करु नकोस थोडी नजर दे तुझ्या प्रेमाची ही झुमका वाली पोर…..

ऊन पडे तुझ्या साडीवर, पोरी येशील का माझ्या गाडीवर अशी टकमक पाहून मनातल्या मनात काय लाजतेय ही झुमका वाली पोर…..

मस्तानी माझं नाव आहे, तूच माझा बाजीराव आहे तुझ्यासोबत येईन मी साजन, तू कर मला तुझी साजनी ही झुमका वाली पोर…..

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.