Bihar Election: एनडीएच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, लोजप बाहेर, भाजप आणि जेडीयूला किती जागा?

बिहारमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये 3 टप्प्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे (Seat distribution of NDA BJP JDU in Bihar Assembly Election 2020).

Bihar Election: एनडीएच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, लोजप बाहेर, भाजप आणि जेडीयूला किती जागा?
Follow us
| Updated on: Oct 04, 2020 | 7:14 PM

पाटणा : बिहारमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये 3 टप्प्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे (Seat distribution of NDA BJP JDU in Bihar Assembly Election 2020). एकिकडे महायुतीने शुक्रवारी मित्र पक्षांसोबतच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब झाला आहे, तर दुसरीकडे एनडीएने देखील आपल्या जागावाटपाचा फॉर्म्युला घोषित केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजप बिहारमध्ये 50-50 फॉर्म्युल्याचा वापर करणार आहेत. यानुसार भाजपच्या जागांमध्ये वाढ होऊन भाजप निम्म्या विधानसभा जागांवर आपली ताकद आजमावणार आहे.

बिहारमध्ये विधानसभेच्या 243 जागा आहेत. जदयू आणि भाजप 119 -119 जागांवर आपले उमेदवार उतरवणार आहेत. इतर 5 जागा जीतनराम मांझी यांच्या ‘हम’ पक्षासाठी सोडण्यात आल्या आहेत. शनिवारी रात्री उशीरा झालेल्या भाजप आणि जदयूच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालं आहे. लोजपला यातून बाहेर ठेवण्यात आलं आहे. एनडीएच्या जागावाटपात भाजपने सातत्याने आपल्या जागेंच्या मागणीसाठी आग्रही भूमिका घेतली. त्यामुळे भाजपला फायदा होऊन जनता दला इतक्याच जागा मिळाल्या आहेत.

दरम्यान, नितीश कुमार यांचा जनता दल पक्ष भाजपपेक्षा जवळपास 15 ते 20 जागा अधिक लढण्याची मागणी करत होता. मात्र, भाजप जागांच्या समान वाटपावर अडून राहिल्याने हा जागावाटपाचा निर्णय बराच लांबला. अखेर मॅरेथॉन मीटिंगनंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि भूपेंद्र यादव दिल्लीसाठी रवाना झाले.

जदयू आणि भाजप नेत्यांमध्ये 5 तास बैठक

भाजपच्यावतीने बिहार निवडणुकीतील जागा वाटपात देवेंद्र फडणवीस यांनी नेतृत्त्व केलं. जनता दलाकडून ललन सिंह, आरसीपी सिंह आणि विजेंद्र यादव यांनी नेतृत्त्व केलं. या चर्चेत लोजपला बाजूला ठेवण्यात आलं. लोजपचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांच्या वेगळ्या भूमिकेमुळे जनता दलाने लोजपच्या एनडीएतील समावेशाला मान्यता दिली नाही. दरम्यान, लोकसभा निवडणुकीतही भाजप आणि जनता दलात 50-50 चाच फॉर्म्युला वापरण्यात आला होता. बिहारमधील एकूण 40 लोकसभा जागांपैकी भाजप आणि जनता दलाने 17-17 जागा लढवल्या होत्या. तसेच 6 जागा लोजपसाठी सोडण्यात आल्या.

बिहारमध्ये 3 टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. पहिल्या फेरीतील मतदान 28 ऑक्टोबर, दूसरे 3 नोव्हेंबर आणि तिसरे 7 नोव्हेंबरला होणार आहे. निकाल 10 नोव्हेंबरला लागणारआहे.

संबंधित बातम्या :

बिहार निवडणुकीत 50 पेक्षा जास्त जागा लढवा, शिवसेना नेत्यांची संजय राऊतांकडे मागणी

तेज प्रताप यादवांना जेडीयूचा शह, दुरावलेली पत्नी ऐश्वर्याला विरोधात तिकीट देण्याचा मेगाप्लॅन

बिहार जिंकणारच, प्रभारीपदी नियुक्ती होताच देवेंद्र फडणवीसांचा एल्गार

Seat distribution of NDA BJP JDU in Bihar Assembly Election 2020

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.