दुसऱ्या टप्प्यातील मोनो रेल्वे सुरु

मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या दुसऱ्या टप्प्यातील मोनो रेल्वेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे. त्यामुळे आता वडाळा ते सातरस्ता या मार्गावर दुसऱ्या टप्प्यातील मोनो रेल्वे धावणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते मोनो रेल्वेचा लोकार्पण सोहळा पार पडला. फेब्रुवारी 2014 ला मोनो रेल्वेचा चेंबूर ते वडाळा हा […]

दुसऱ्या टप्प्यातील मोनो रेल्वे सुरु
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या दुसऱ्या टप्प्यातील मोनो रेल्वेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे. त्यामुळे आता वडाळा ते सातरस्ता या मार्गावर दुसऱ्या टप्प्यातील मोनो रेल्वे धावणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते मोनो रेल्वेचा लोकार्पण सोहळा पार पडला.

फेब्रुवारी 2014 ला मोनो रेल्वेचा चेंबूर ते वडाळा हा पहिला टप्पा सुरु झाला. मात्र, या मार्गावरील ठिकाणं ही कमी वर्दळीची असल्याने याठिकाणी मोनो रेल्वेला मोठे नुकसान झाले. दुसऱ्या टप्प्यातील मोनो रेल्वेचा मार्ग हा वर्दळीचा असल्याने हे चित्र बदलण्याची शक्यता आहे.

दुसऱ्या टप्प्यातील मोनो रेल्वेचा पूर्ण मार्ग हा 19.54 किलोमीटर लांबीचा आहे. आधी चेंबूरपासून महालक्ष्मीपर्यंतचा प्रवास करण्यासाठी 90 मिनिटं लागायची. मात्र, आता दुसरा टप्पा कार्यान्वित झाल्यानंतर यासाठी अवघे 30 मिनिटं लागणार आहेत.

मोनो रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्यात जी.टी.बी. नगर, अँटाॅप हिल, आचार्य अत्रे नगर, वडाळा ब्रिज, दादर पूर्व, नायगाव, आंबेकर नगर, मिंट कॉलनी, लोअर परेल, संत गाडगे महाराज चौक ही स्थानके आहेत. तर मोनोच्या पहिल्या टप्प्यात म्हणजेच चेंबूर ते वडाळा दरम्यान 5, 7, 9 आणि 11 रुपये असा तिकीटदर होता. आता वडाळा ते जेकब सर्कल यादरम्यान हाच दर 10, 20, 30 आणि 40 रुपये असा असेल.

दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर मोनोची प्रवासी संख्या दिवसाला एक लाख असेल, अशी अपेक्षा आहे. दुसरा टप्प्यातील मार्गात लोअर परळ, नायगाव, दादर, अँटाॅप हिल, जी. टी. बी. नगर हे वर्दळीचे ठिकाणं आहेत. त्यामुळे मोनो रेल्वेला जास्त प्रवासी मिळण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यातील मोनो रेल्वेला दरमहा 80 लाख ते एक कोटींचा तोटा सध्या सहन करावा लागत आहे. मोनो रेल्वेने दररोज 15 हजार प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे मोनो रेल्वेला दिवसाला 18 ते 20 हजार रुपयांचा महसूल तिकीट विक्रीतून होतो. दुसऱ्या टप्प्यातील मोनो रेल्वे सुरू झाल्याने तोट्यात असलेल्या मोनो रेल्वेला एक नवी उमेद मिळाली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.