पायाखालची जमीन खचणे म्हणजे नेमकं काय? पाहा व्हिडीओ
चीन: पायाखालची जमीन खचणे , ही म्हण आपण अनेकदा ऐकली असेल. पण चीनमध्ये खरोखरच याचा प्रत्यय पाहायला मिळाला. इथे एका महिलेच्या पायाखालून खरोखरच जमीन सरकली आणि ती महिला 10 फुटाच्या सिंकहोलमध्ये पडली. यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे. चीनच्या लॅनझोऊ शहरातील गजबजलेल्या रस्त्यालगतच्या फुटपाथवरून चालत असताना अचानकपणे फूटपाथ कोसळून ही दुर्घटना घडली. हा सिंकहोल तब्बल 10 फूट […]
चीन: पायाखालची जमीन खचणे , ही म्हण आपण अनेकदा ऐकली असेल. पण चीनमध्ये खरोखरच याचा प्रत्यय पाहायला मिळाला. इथे एका महिलेच्या पायाखालून खरोखरच जमीन सरकली आणि ती महिला 10 फुटाच्या सिंकहोलमध्ये पडली. यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे. चीनच्या लॅनझोऊ शहरातील गजबजलेल्या रस्त्यालगतच्या फुटपाथवरून चालत असताना अचानकपणे फूटपाथ कोसळून ही दुर्घटना घडली. हा सिंकहोल तब्बल 10 फूट खोल होता. पण सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.
10 फुटाच्या सिंकहोलमध्ये पडल्याने त्या महिलेच्या बरगड्यां फ्रॅक्चर झाल्या आहेत. मात्र जखमी महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. चीनच्या ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्ककडून या घटनेचा व्हिडीओ जारी करण्यात आला आहे, ज्यामध्ये आपण ही घटना कशाप्रकारे घडली हे बघू शकता.
रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही सर्व घटना कैद झाली आहे. व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे त्याच फूटपाथवर अनेक लोक दिसतात. त्यांच्या मागे या अपघातातील महिला आहे, जी तिथे बसची वाट बघत उभी होती. अचानकपणे तिच्या पायाखालील फूटपाथ कोसळला आणि ती महिला 10 फूट खोल सिंकहोलमध्ये पडली. आजूबाजूचा परिसर ढासळल्याने ती महिला त्याखाली दबली गेली. ती मदतीसाठी हाक देत होती.
यानंतर काही वेळाने पोलीस आणि रुग्णवाहिका त्याठिकाणी दाखल झाल्या. सध्या त्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर पोलीस यंत्रणा फूटपाथ कोसळण्यामागील कारणांचा तपास घेत आहेत.