पगार नाही, कामावरुन काढलं, सिंहगडच्या प्राध्यापकाने कागदपत्रं जाळली
योगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, पुणे: पगार होत नाही आणि संस्थेने कामावरुन काढून टाकल्याने चिडलेल्या प्राध्यापकाने शैक्षणिक कागदपत्रे जाळून टाकली. पुण्यात ही घटना घडली. सिंहगड कॉलेजच्या वारजे येथील महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या सुरज माळी या प्राध्यापकाने हतबल होऊन हा प्रकार केला. प्राध्यापक कागदपत्रे जाळून टाकत असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायल होत आहे. शिक्षकाच्याही आयुष्याला अर्थ असतो. […]
योगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, पुणे: पगार होत नाही आणि संस्थेने कामावरुन काढून टाकल्याने चिडलेल्या प्राध्यापकाने शैक्षणिक कागदपत्रे जाळून टाकली. पुण्यात ही घटना घडली. सिंहगड कॉलेजच्या वारजे येथील महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या सुरज माळी या प्राध्यापकाने हतबल होऊन हा प्रकार केला.
प्राध्यापक कागदपत्रे जाळून टाकत असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायल होत आहे.
शिक्षकाच्याही आयुष्याला अर्थ असतो. प्राध्यापकांना कुटुंब आहे. सिंहगडच्या प्राध्यापकांना बँकही कर्ज देत नाही. पगाराविना प्राध्यापकांची दयनीय अवस्था झाली आहे. शिक्षक म्हणून काम करण्याचा विश्वास उडाला आहे, असं नमूद करत सुरज माळी यांनी कागदपत्रे जाळून टाकली आहेत.
पगाराचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे. तो कधी सुटेल ते पांडुरंगाला, देवालाच माहित असेही त्यांनी म्हटलं आहे.