पुणे : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात (separate Corona Hospital for Pune Police) आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता अत्यावशक सेवेमधील कर्मचारी डॉक्टर, नर्स, पोलीस, महापालिकेचे कर्मचारी यांनाही होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता पुण्यातील कोरोनाबाधित पोलिसांच्या उपचारासाठी स्वतंत्र रुग्णालय तयार केलं जाणार आहे, असा निर्णय पुणे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी (separate Corona Hospital for Pune Police) घेतला.
कोरोनाबाधित पोलिसांवर उपचार करण्यासाठी अद्यावत असं रुग्णालय तयार केलं जाणार आहे. या रुग्णालयात 50 बेड्सची व्यवस्था केली जाणार आहे. सध्या पुण्यात कोरोनाबाधित पोलिसांवर विविध खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सिम्बॉयसिस रुग्णालयात पोलिसांसाठी राखीव वॉर्ड
कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर पोलिसांसाठी सिम्बॉयसिस हॉस्पिटलमध्ये अद्यावत वॉर्ड राखीव ठेवण्यात आला आहे. 50 बेडचा हा वॉर्ड पोलिसांसाठी राखीव ठेवला आहे. त्याचबरोबर दिनानाथ आणि सह्याद्री हॉस्पिटलमध्येही बेड राखीव ठेवण्याबाबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे या दोन हॉस्पिटलमध्येही आम्हाला काही बेड राखीव मिळणार असल्याची माहिती काल (29 एप्रिल) सह पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे यांनी दिली. कोणत्याही पोलीसाला लक्षणं आढळल्यास त्वरित उपचार केले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
कोरोना बाधित पोलिसांसाठी बिनव्याज एका लाख रुपये
“कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या आठ पोलिसांना दहा हजाराचा रिवॉर्ड दिला जाणार आहे. हे बक्षीस पोलीस कल्याण निधीतून त्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे. तर आगाऊ रक्कम म्हणून एक लाख रुपये बिनव्याजी संबंधित पोलिसांना दिली जाणार आहे”, असंही शिसवे यांनी सांगितलं.
दरम्यान, राज्यात आतापर्यंत अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर तीन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. नुकतेच मुंबई पोलीस आयुक्तांनी 55 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या पोलीस खात्यातील ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना घरीच थांबण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या :
55 वर्षापेक्षा वयस्क पोलिसांना घरीच थांबण्याचे निर्देश, मुंबई पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय
पुण्यात दोन पोलिसांना कोरोनाची लागण, दादर पोलीस वसाहतीतही कोरोनाचा शिरकाव
पुण्यातील 102 पोलीस चौकीचं काम पोलीस ठाण्यातून चालणार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय