नाशिक स्मार्ट सिटीचे तीनतेरा, आधी नाशिककर त्रस्त, आता वरिष्ठ अधिकाऱ्यांचे गंभीर आरोप

देशभरात स्मार्ट सिटीची चांगलीच चर्चा झाली. मात्र, जसजसे दिवस जात आहेत, तसतसे स्मार्ट सिटीबाबत अनेक आरोप प्रत्यारोपही होऊ लागले आहेत (Nashik Smart City).

नाशिक स्मार्ट सिटीचे तीनतेरा, आधी नाशिककर त्रस्त, आता वरिष्ठ अधिकाऱ्यांचे गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Dec 18, 2019 | 3:46 PM

नाशिक : देशभरात स्मार्ट सिटीची चांगलीच चर्चा झाली. मात्र, जसजसे दिवस जात आहेत, तसतसे स्मार्ट सिटीबाबत अनेक आरोप प्रत्यारोपही होऊ लागले आहेत (Nashik Smart City). नाशिक शहरात सुरु असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामांबाबत एकीकडे नाशिककर त्रस्त आहेत. आता दुसरीकडे खुद्द स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनीच आपल्या वरिष्ठांवर कामात अनियमितता असल्याचे गंभीर आरोप केले. आरोप झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र कामात कोणतीही अनियमितता नसल्याचा दावा करत आरोप फेटाळले आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे (Nashik Smart City).

देशातील काही निवडक शहरांमधे राबवण्यात येणाऱ्या स्मार्ट सिटींच्या यादीत नाशिकचा समावेश झाला. त्यानंतर खरंतर नाशिककरांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. प्रत्यक्षात मात्र या कामाच्या निमित्तानं शहरातील रस्त्यांचा आणि वाहतुकीचा बोजवारा उडाल्याचं पाहायला मिळालं. यामुळे नाशिककरांना या कामांचा फायदा कमी आणि त्रासच अधिक झाल्याचं समोर आलं आहे. अशात आता स्मार्ट सिटीच्या डीजीएम पदावरुन नुकतेच पायउतार झालेले सुनिल विभांडीक यांनी या कामांमध्ये प्रचंड अनियमितता असल्याचा आरोप केला.

“निविदा देताना मर्जीतील ठेकेदारांना कामं, चूक लक्षात आणून दिल्यास तडकाफडकी बदली”

शासनाकडून येणारा निधी वापरला जात नाही. निविदा देताना मर्जीतील ठेकेदारांना कामं देणं, अधिकाऱ्यांनी चूक लक्षात आणून दिल्यास त्यांची तडकाफडकी बदली करणे यासारखे प्रकार स्मार्ट सिटीमध्ये सुरु असल्याचा गंभीर आरोप सुनिल विभांडीक यांनी केला आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या नावाखाली अधिकारी आणि ठेकेदार आपले खिसे भरण्याचा प्रकार तर करत नाही ना असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

“आरोपांचे पुरावे सादर करावेत, अन्यथा गुन्हा दाखल करणार”

दरम्यान आपण वरिष्ठांना याबाबत तक्रार करण्यास गेलो असता वरिष्ठांनी आपल्याला काम थांबवण्याचे आदेश दिल्याचा आरोपही विभांडीक यांनी केला. दुसरीकडे स्मार्ट सिटीचे सीईओ असलेल्या प्रकाश थवील यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. थवील म्हणाले, “ठराविक ठेकेदारांना काम देण्यासाठी विभांडीक आपल्यावर दबाव आणत होते. म्हणून त्यांच्यावर कारवाई केली. ते आपल्याबाबत चुकीची माहिती पसरवत आहेत. विभांडीक यांनी केलेल्या आरोपांचे पुरावे सादर करावेत, अन्यथा त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्याचा इशारा थवील यांनी दिला आहे.

कामाच्या नियमिततेबाबत चौकशी होणार का?

शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु असलेल्या कामांमुळे नाशिककर त्रस्त आहेत. वेळेत कामं पूर्ण न करणं, वाहतुकीचा खोळंबा, काम वेळेवर न होऊनही ठेकेदारांना दिली जाणारी वाढीव रक्कम आणि मुदत यामुळे या कामांबाबत नगरसेवक देखील अनेकदा आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं होतं. त्यातच आता थेट स्मार्ट सिटीच्या अधिकांऱ्यांनीच या कामाच्या नियमिततेबाबत प्रश्न उपस्थित केल्यानं या अंतर्गत वादाची चौकशी होणार का हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे.

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.