भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट, संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत आदर पुनावालांचे भाषण दाखवले जाणार

कोरोना विषाणू संसर्गाचा सामना करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत आदर पुनावालांचे भाषण दाखवले जाणार आहे. Adar Poonawalla UN Conference

भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट, संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत आदर पुनावालांचे भाषण दाखवले जाणार
Follow us
| Updated on: Dec 03, 2020 | 12:50 PM

न्यूयॉर्क: कोरोना विषाणू संसर्गाचा सामना करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांमध्ये 140  देशांच्या प्रतिनिधींची परिषद होत आहे. या परिषदेत कोरोना विषाणू, कोरोनाचा परिणाम, कोरोनाचे जगावरिल परिणाम यांवर चर्चा होणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेचे अध्यक्ष वोल्कन वोजकिर यांच्या उपस्थित कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याबाबत ऐतिहासिक परिषदेला संबोधित करणार आहेत. भारतासाठी अभिमानाची बाब म्हणजे सीरम इन्स्टिट्युटचे आदर पुनावाला यांचे भाषण 4 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्रांच्या ऐतिहासिक परिषदेत दाखवले जाणार आहे. (Aadar Poonawalla recorded video shown in UN conference)

‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांचे रेकॉर्डड भाषण 4 डिसेंबरला संयुक्त राष्ट्रांच्या ऐतिहासिक परिषदेत दाखवण्यात येईल. ‘बायोटेक’चे सह-संस्थापक यूगुर साहिन आणि ओजेल ट्यूरसी, ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीमध्ये वॅक्सिन विकसित करणाऱ्या टीमचे प्रमुख सारा गिल्बर्ट आणि जीएवीआई (वॅक्सिन गठबंधन) चे मुख्य कार्यकारी अधिकारी सेथ बर्कले हे देखील विशेष सत्राला संबोधित करणार आहेत. संयुक्त राष्ट्रांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी महासचिव गुतारेस सर्व देश आणि नागरिकांची कोरोना लसीची गरज लक्षात घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी लक्ष देण्यात येणार आहे. ‘कोरोनावरिल लस ही जागतिक जन संपत्ती’ असेल, त्याचा आधार घेऊन संयुक्त राष्ट्रांचे महासचिव भाषण करणार असल्याची माहिती स्टीफन दुजारिक यांनी दिली.

140 देशांचे प्रतिनिधी सहभागी

कोरोना विषाणू (Corona Virus) संसर्गावावर मात करण्यासाठी 140 देशांचे मंत्री आणि प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. संयुक्त राष्ट्र महासभेची कोरोनावर चर्चा करण्यासाठी विशेष परिषद होत आहे. कोरोनासारख्या जागतिक महामारीचा प्रभाव आणि आरोग्य व्यवस्थेवरिल संकटाचा सामना करण्यासाठीच्या उपायांवर चर्चा केली जाणार आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळं जगात 15 लाख नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. (Aadar Poonawalla recorded video shown in UN conference)

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेचे अध्यक्ष वोल्कन यांनी, ‘काही कोरोना लसींना परवानगी देण्यात आलीय, कोरोना विरोधातील लढाईसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रांकडे जगाचे नेतृत्व करण्याची मोठी संधी आहे. संपूर्ण जग संयुक्त राष्ट्रांकडे आशेने पाहत आहे, असं सांगितले. फ्रान्सचे राष्ट्रपती इम्यॅन्यअल मॅक्रॉन, जर्मनीच्या चॅन्सलर एंजेला मर्केल, ब्रिटेनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन, जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामफोसा आणि यूरोपीय संघाचे प्रमुख चार्ल्स माइकल यांच्या नावाचा समावेश आहे. अमेरिकेचे आरोग्य आणि मानव सेवा मंत्री अ‌ॅलेक्स एज़र उच्चस्तरीय बैठकीला संबोधित करतील. ही परिषद ऑनलाईन स्वरुपात होईल.

संबंधित बातम्या :

“कोरोना लसीला मंजुरी दिली असली तरी संघर्ष संपलेला नाही”, लसीकरणाचं मोठं आव्हान: बोरिस जॉनसन

BREAKING | फायझर-बायोएनटेक कोरोना लसीला मंजुरी देणारा पहिला देश ठरला UK! पुढील आठवड्यापासून वितरण सुरु

( Aadar Poonawalla recorded video shown in UN conference)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.