भारतात कोरोना लस कधी येणार? जगातील सर्वात मोठ्या कोरोना लस उत्पादन कंपनीकडून माहिती

सीरम इंस्टीट्युटच्या अधिकाऱ्यांनी मार्च 2021 पर्यंत भारतात कोरोना विषाणूवरील लस उपलब्ध होऊ शकेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

भारतात कोरोना लस कधी येणार? जगातील सर्वात मोठ्या कोरोना लस उत्पादन कंपनीकडून माहिती
Follow us
| Updated on: Oct 18, 2020 | 12:31 AM

नवी दिल्ली : भारतात (India) कोरोना लस कधी येणार याकडे सर्वच भारतीयांचं लक्ष लागून आहे. त्यातच आता कोरोना लस उत्पादन करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी सीरम इंस्टीट्युटच्या अधिकाऱ्यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या अंदाजानुसार मार्च 2021 पर्यंत भारतात कोरोना विषाणूवरील लस उपलब्ध होऊ शकणार आहे (Serum institute official said India may get COVID vaccine by march 2021).

सीरम इंस्टीट्यूटचे कार्यकारी संचालक डॉ. सुरेश जाधव (Dr. Suresh Jadhav) म्हणाले, “अनेक कंपन्या कोरोना लस तयार करण्यावर वेगाने काम करत आहेत. भारतात देखील कोरोना लशीच्या वैद्यकीय चाचण्या वेगाने होत आहेत. सीरम इंस्टीट्यूट देशात ऑक्सफोर्ड-अस्त्राजेनेताच्या कोरोना लशीच्या वैद्यकीय चाचणी करत आहे. जर नियंत्रकांनी लवकर मंजूरी दिली तर मार्च 2021 पर्यंत भारतात कोरोना लस उपलब्ध होईल.”

“देशातील दोन कोरोना लस उत्पादन कंपन्या तर तिसऱ्या म्हणजेच अंतिम टप्प्यातील कोरोना लस चाचणी करत आहेत. अन्य एक कोरोना लस सध्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीत आहे. इतरही कोरोना लस उत्पादन कंपन्या वेगाने काम करत आहेत,”  असंही त्यांनी नमूद केलं.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना लस उपलब्ध होण्याबाबत अंदाज व्यक्त केला होता. जगभरात कोरोनाच्या 10 लस चाचणीच्या अंतिम टप्प्यात आहेत. यापैकी कोणती ना कोणती लस 2020 च्या अखेरपर्यंत किंवा 2021 च्या सुरुवातीला या लस यशस्वीपणे नोंदणीकृत होईल, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली होती (WHO Chief Scientist on Corona Vaccine availability).

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मुख्य संशोधक सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या होत्या, “जगभरात जवळपास 40 कोरोना लशीचे नमुने कोणत्या ना कोणत्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीत आहेत. त्यापैकी जवळपास 10 कोरोना लस तर तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीपर्यंत पोहचल्या आहेत. हा कोरोना लस चाचणीचा अंतिम टप्पा आहे. या वैद्यकीय चाचणी लस किती प्रभावी आणि सुरक्षित असेल हे दाखवून देतात. त्यामुळे डिसेंबर 2020 किंवा 2021 च्या सुरुवातीच्या महिन्यात कोरोना लस तयार होईल अशी आशा आहे.”

डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी या 10 पैकी कोणती ना कोणती लस यशस्वी होऊन वर्षअखेरपर्यंत उपलब्ध होईल, अशी आशा व्यक्त केली होती.

संबंधित बातम्या :

WHO ने दिली आनंदाची बातमी, कोरोनाची लस कधी येणार? यावर मोठं विधान

COVID Vaccine | कोव्हिड लस सर्वात आधी कोणाला मिळणार? डॉ. हर्ष वर्धन यांचं उत्तर

शरद पवारांना कोरोनाची लस टोचली?; डॉक्टरांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

Serum institute official said India may get COVID vaccine by march 2021

Non Stop LIVE Update
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....