तान्ह्या बाळासाठी शहापूरची शिवसेना धावली, पहाटे 3 पासून अडकलेल्या उत्तर भारतीय चिमुरड्यासाठी दुधाची व्यवस्था

शहापूरमधील शिवसेनेचे कार्यकर्ते उत्तर भारतीय तान्ह्या बाळाच्या मदतीसाठी धावले आहेत (Shivsena workers help to north indian migrant labours).

तान्ह्या बाळासाठी शहापूरची शिवसेना धावली, पहाटे 3 पासून अडकलेल्या उत्तर भारतीय चिमुरड्यासाठी दुधाची व्यवस्था
Follow us
| Updated on: May 11, 2020 | 5:36 PM

ठाणे : देशभरात लॉकडाऊनमुळे मजुरांचं स्थलांतरण पाहायला मिळत आहेत. हे स्थलांतर केवळ त्यांचं नसून त्यांच्या कुटुंबातील लहानमोठ्या सर्वच सदस्यांचंही आहे. शहरातील हालअपेष्टा आणि कोरोना संसर्गाच्या भीतीने अनेक मजुरांनी आपल्या गावाची वाट धरली आहे. मात्र, हा प्रवासही त्यांच्यासमोर अनेक आव्हानं उभी करताना दिसत आहे. शहापूरमध्ये असंच एक उदाहरण पाहायला मिळालं (Shivsena workers help to north indian migrant labours). शहरात आलेले काही उत्तर भारतीय स्थलांतरित मजूर गावाकडे परतत असताना मध्यरात्री 3 वाजता त्यांची गाडी शहापूर भागात खराब झाली. त्यामुळे त्या गाडीत असणारे 80 मजूरही तेथेच अडकले. मात्र, यात एक महिला आपलं 1 महिन्याचं बाळ घेऊन प्रवास करत असल्याने तिची मात्र मोठी अडचण झाली. यावेळी शहापूरची शिवसेना त्या तान्ह्या बाळासाठी धावली (Shivsena workers help to north indian migrant labours).

सर्व मजूर उपाशी पोटीच आपल्या गावाच्या ओढीने प्रवास करत होते. लवकरच गावात पोहचू या आशेसह ते प्रवासाकडे नजर लावून बसले होते. मात्र, गाडी खराब झाल्याने या मजुरांसह त्यांच्यासोबत असलेल्या लहान मुलांचेही हाल झाले. यात एका 1 महिन्याच्या बाळाचाही समावेश होता. बाळासाठी तातडीने दुधाची गरज होती. मात्र, आजूबाजूला दुध मिळण्याची कोणतीच शक्यता नव्हती.

अशावेळी शहापूर शिवसेनेचे तालुका प्रमुख मारुती धीर्डे आणि संपर्कप्रमुख आकाश सावंत यांनी घटनास्थळावर जाऊन या मजुरांची चौकशी केली. त्यावेळी दुधाची गरज लक्षात येताच त्यांनी आजुबाजुला दुधाचा शोध घेतला मात्र मिळालं नाही. लॉकडाऊन सुरु असल्याने कोठेच दुध मिळणं शक्य नव्हतं. अशावेळी धीर्डे यांनी आपल्या घरी जाऊन तान्ह्या बाळासाठी दुध आणलं.

शिवसेनेच्या या पदाधिकाऱ्यांनी केवळ या भुकेल्या बाळाचीच व्यवस्था केली नाही, तर उपाशी पोटी प्रवास करणाऱ्या गाडीतील 80 मजुरांसाठी देखील त्यांनी जेवणाची व्यवस्था केली. त्यांनी सर्वांना दुपारी जेवण, दूध, बिस्किटे, पाण्याच्या बॉटलही उपलब्ध करुन दिल्या. विशेष म्हणजे 1 महिन्याच्या तान्ह्या बाळासह प्रवास करणाऱ्या या महिलेला दुध उपलब्ध झाल्याने तिनेही सुटकेचा श्वास सोडला. कठीण प्रसंग धावून आल्यामुळे एका महिन्याच्या बाळाच्या आईसह इतर सर्व मजुरांनी शिवसेनेच्या या मदतीचे आभार मानले आहे.

परप्रातियांच्या मुद्द्यावर शिवसेना आणि शिवसैनिक नेहमीच आक्रमक असल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र, या कोरोना संकटाच्या काळात शिवसैनिकांनी देखील माणूस म्हणून मदतीचा हात पुढे केल्यानं नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.

संबंधित बातम्या :

चालत जाणाऱ्या मजुरांसाठी एसटीकडून मदतीचा हात, मजुरांकडून एसटीचे आभार

मुंबईतील लोक कोरोना घेऊन येतील अशी गावकऱ्यांमध्ये भीती, आंतरजिल्हा एसटीचा निर्णय लवकरच : अनिल परब

वर्ध्यात कोरोनाग्रस्त महिलेच्या अंत्यसंस्कारांना उपस्थित 141 जण क्वारंटाईन, 13 गावं सील

Shivsena workers help to north indian migrant labours

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.