मुलीची दहावीची परीक्षा, शुभेच्छा देण्यासाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई पत्नीसोबत परीक्षा केंद्रावर
दहावीची परीक्षा म्हटलं की मुलांसोबतच पालकांचीही लगबग वाढते. मुलांच्या टेन्शनसोबत पालकांचंही टेन्शन वाढतं (Shambhuraje Desai wish daughter).
सातारा : दहावीची परीक्षा म्हटलं की मुलांसोबतच पालकांचीही लगबग वाढते. मुलांच्या टेन्शनसोबत पालकांचंही टेन्शन वाढतं (Shambhuraje Desai wish daughter). मग हेच टेन्शन कमी करण्यासाठी पालकांकडून मुलांना तणावमुक्त करण्याचे अनेक मार्ग अवलंबले जातात. त्यातीलच एक भाग म्हणजे मुलांना परीक्षा केंद्रावर सोडायला येत त्यांना शुभेच्छा देणे. याला राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई देखील अपवाद राहिले नाही. त्यांनी देखील आपल्या मुलीला दहावीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यासाठी पत्नीसह थेट परीक्षा केंद्र गाठलं.
दहावीच्या परीक्षेला नुकतीच सुरुवात झाली आहे. प्रत्येक पालक आपल्या मुलाला परीक्षेचं कोणतंही दडपण राहू नये यासाठी शुभेच्छा द्यायला परीक्षा केंद्रावर जात आहेत. त्यामुळे परीक्षा सुरु होण्यापूर्वी आणि सुटण्यापूर्वी पालकांची शाळा परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. याच गर्दीत महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी देखील आपल्या पत्नीसोबत त्यांची कन्या ईश्वरीला शुभेच्छा दिल्या.
राज्याच्या अधिवेशनास 2 दिवस सुट्टी असल्यामुळे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई आवर्जून मुलीसाठी वेळ काढून आले. त्यांनी अनंत इंग्लिश मेडिअम स्कूल येथील परीक्षा केंद्रावर आपल्या मुलीला शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना ते म्हणाले मी कुटुंबासाठी खास वेळ काढला आहे. माझी कन्या ईश्वरी दहावीत असून तिची परीक्षा सुरु झाली आहे. पहिल्या दोन पेपरला तिची आणि माझी भेट होऊ शकली नाही. त्यामुळे मुद्दामहून आज तिला शुभेच्छा देण्यासाठी स्वतः परीक्षा केंद्रावर आलो.
संबंधित बातम्या :
कराड : उदयनराजे आणि शंभूराजेंची पाटणमध्ये रॅली, दोन्ही राजेंचं मतदारांना अभिवादन
Shambhuraje Desai wish daughter for SSC Exam