Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar | डॉक्टर्स, नर्स, वेळेवर औषध नाही, जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये कसे उपचार दिले जातात? शरद पवारांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले

पुण्यात वेळेत सुविधा उपलब्ध न झाल्याने काल 'टीव्ही 9 मराठी'चे पुण्याचे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाला. या घटनेकडे पवारांनी बोट दाखवलं

Sharad Pawar | डॉक्टर्स, नर्स, वेळेवर औषध नाही, जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये कसे उपचार दिले जातात? शरद पवारांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Follow us
| Updated on: Sep 04, 2020 | 1:11 AM

पुणे : शहरातील जम्बो कोव्हिड केअर सेंटर मध्ये कसे उपचार दिले (Sharad Pawar At Pimpari Corona War Room) जातात याप्रकरणी शरद पवारांनी प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अचानक पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोरोना वॉर रुमला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते (Sharad Pawar At Pimpari Corona War Room).

शरद पवारांना महानगरपालिकेमध्ये येऊन कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. गेल्या काही दिवसांत शहरात रोज एक हजारांहून अधिक कोरोना संक्रमित रुग्ण आढळू लागले आहेत. तर रोज मृतांचा आकडाही वाढू लागला आहे. ही आकडेवारी कशी आवाक्यात आणता येईल याबाबतची पवारांकडून काही सूचना देखील महापालिका आयुक्त आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप आणि महापालिका आयुक्त हे वायसीएम रुग्णालयात कसे योग्य उपचार दिले जात आहेत, याची हुशारकी मारत असताना शरद पवारांनी सर्वांचे कान देखील टोचले.

पुण्यात वेळेत सुविधा उपलब्ध न झाल्याने काल ‘टीव्ही 9 मराठी’चे पुण्याचे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाला. या घटनेकडे पवारांनी बोट दाखवलं आणि पिंपरी मधील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये नेमकं कसे उपचार दिले जात आहेत, हा महत्वाचा प्रश्न असल्याचं शरद पवारांनी म्हटलं. “तुम्ही पाहताय पुण्यातील माध्यम प्रतिनिधीचा मृत्यू झाला. पत्रकार असो की सामान्य यात अनेक बिचाऱ्यांचे मृत्यू होत आहेत. कोरोनासाठी स्वतंत्र व्यवस्था करुनही अनेक बाबी समोर येत आहेत”, असं शरद पवार म्हणाले (Sharad Pawar At Pimpari Corona War Room).

“डॉक्टर्स नाही, नर्स नाही, वेळेवर औषध नाही अशा तक्रारी येत आहेत”, अशी खंत ही पवारांनी व्यक्त केली. काही अति करतात, पण असं घडता कामा नये, अशी सूचनाही पवारांनी यावेळी दिली.

पत्रकारही कोरोना वॉरियर्स – रोहित पवार 

राष्ट्रवादीचे नेते आणि तरुण आमदार रोहित पवार यांनी देखील पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूबाबत दु:ख व्यक्त केलं. “जीव धोक्यात घालून काम करणारे पत्रकारही कोरोना वॉरियर्स आहेत. पांडुरंग रायकर यांच्या जाण्यामुळे पत्रकारांच्या आरोग्याचा विषय ऐरणीवर आला आहे. अॅक्रीडेशन धारक पत्रकारांना सरकारी मदत मिळेल,पण इतर पत्रकारांची त्यांच्या संस्थेने काळजी घ्यावी व सरकारनेही त्यांच्याबाबत सकारात्मक विचार करावा”, असं ट्वीट रोहित पवारांनी केलं.

Sharad Pawar At Pimpari Corona War Room

संबंधित बातम्या :

भारतीय उपखंडाला चीन सर्व दिशांनी वेढतोय, शरद पवारांकडून चिंता व्यक्त, माजी हवाईदल प्रमुख आणि माजी परराष्ट्र सचिवांशी चर्चा

पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक.
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या.
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट.
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया.
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक.
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल.
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.