कोरोना संकटात काम करावंच लागेल, शरद पवारांचं खासगी डॉक्टरांना इंजेक्शन

शरद पवार यांनी औरंगाबादमध्ये राज्यातील खासगी रुग्णालयांना सल्ला वजा इशारा दिला आहे (Sharad Pawar on Private hospitals doctors).

कोरोना संकटात काम करावंच लागेल, शरद पवारांचं खासगी डॉक्टरांना इंजेक्शन
Follow us
| Updated on: Jul 25, 2020 | 4:01 PM

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या राज्यभरात विविध ठिकाणी भेट देऊन कोरोनाच्या स्थितीची प्रत्यक्ष पाहणी करत आहेत. तसेच उपाययोजनांचा आणि नागरिकांच्या प्रश्नांचा आढावा घेत आहेत. ते आज (25 जुलै) औरंगाबादमध्ये आले असताना त्यांनी राज्यातील खासगी रुग्णालयांना सल्ला वजा इशारा दिला आहे (Sharad Pawar on Private hospitals doctors). कोरोनाच्या संकटात खासगी रुग्णालयांना आणि डॉक्टरांना काम करावंच लागेल असं म्हणत सहकार्य न करणाऱ्यांविरोधात कारवाईचा इशारा त्यांनी दिला.

शरद पवार म्हणाले, “या कोरोनाच्या संकटात खासगी रुग्णालये आणि डॉक्टरांनीही डॉक्टरांनी पूर्ण सहकार्य केले पाहिजे. जर जिल्हाधिकाऱ्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील लोकांकडे मदत मागितली तर ती दिली पाहिजे. कोणी देत नसेल, तर हॉस्पिटल ताब्यात घेऊन समन्स देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. राज्यात सध्या बेड वाढवण्याची गरज आहे. ही एक कमतरता आहे. खासगी डॉक्टरांना या आजारात साथ द्यावी लागेल.”

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“कोरोना संकटाला सगळ्यांनी मिळून सामोरं गेलं पाहिजे. सगळ्यांनी एकत्र आलं तर या संकटाचा सामना करण्यात यश येईल. देशातील 5-6 राज्यांची स्थिती काळजी करण्यासारखी आहे. यात महाराष्ट्रचाही समावेश आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, कल्याण, डोंबिवली, पिंपरी चिंचवड आणि औरंगाबाद ही शहरं चिंता करण्यासारखी आहेत. अनेक उत्सवात लोकांनी सहकार्य केले. त्यामुळे हा आजार पसरु शकला नाही. त्यामुळे ईद घरात साजरी करावी आणि नमाज सुद्धा घरात करावा आणि एक आदर्श घालून द्यावा,” असं शरद पवार यांनी सांगितलं.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

‘मी सतत लोकांमध्ये जाणारा माणूस, मला एकाजागी बसवत नाही’

शरद पवार म्हणाले, “मुख्यमंत्री टीमकडून काम करुन घेत आहेत. सर्वांशी संवाद आणि समन्वय ठेवून मुख्यमंत्र्यांना निर्णय घ्यावे लागतात. त्याप्रमाणे मुख्यमंत्री निर्णय घेत आहेत. मी फिरतोय कारण मी सतत लोकांमध्ये जाणारा माणूस, मला एकाजागी बसवत नाही.”

अनेक जिल्हे आहेत, ज्यांनी मला खूप मदत केली. त्यामुळे तिथे संकट आल्यानंतर त्यांची चौकशी करणं, मदत करणं या भावनेने मी आलो आहे. उद्या मी मुंबईला गेलो की मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन, ज्या कमतरता आहेत, त्या सांगेन. माझी खात्री आहे, मुख्यमंत्री ताबडतोब निर्णय घेतील आणि त्याच पद्धतीने एवढ्या व्यापक संकटाला तोंड देणं आवश्यक आहे, असं शरद पवारांनी सांगितलं.

संबंधित व्हिडीओ :

हेही वाचा :

माझं सर्वात मोठं ऑब्जेक्शन आहे, माझं वय 80 आहे, तुम्ही 85 का म्हणता? : शरद पवार

अहमदनगरमध्ये लॉकडाऊनची गरज नाही : पालकमंत्री हसन मुश्रीफ

Uddhav Thackeray : शरद पवारांच्या राम मंदिराच्या विधानावर उद्धव ठाकरे म्हणतात…

Sharad Pawar on Private hospitals doctors

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.