‘आज आले का ? अरे व्वा !’, शरद पवारांची प्रतिक्रिया
घरीही सचिवालय असते, तसं वर्षावरही आहे. त्यामुळ ते आले नाही आले तरी राज्याचा कारभार थांबला नाही. राज्याचा कारभार सुरू आहे. त्यांच्याकडे आलेल्या फाईल पूर्ण करतात.
मुंबई : मुख्यमंत्री (Chief Minister) दोन वर्षानंतर मंत्रालयात आले, याबाबत शरद पवारांना विचारले असता, पवारांनी आज आले का? असा प्रतिप्रश्न केला. त्यावर पत्रकारांनी (Journalists)हो असे उत्तर दिले. लगेच पवारांनी हसत अरे वा…अशी प्रतिक्रिया दिली. तसेच त्यांच्या तब्येतीच्या कारणाने येत नव्हते. मी अनेक राज्यात बघतो. मुख्यमंत्री घरी बसूनच निर्णय घेतात. घरीही सचिवालय असते, तसं वर्षावरही आहे. त्यामुळ ते आले नाही आले तरी राज्याचा कारभार थांबला नाही. राज्याचा कारभार सुरू आहे. त्यांच्याकडे आलेल्या फाईल पूर्ण करतात. निर्णय घेतात. त्यामुळे त्याबाबतची चिंता माझ्या मनात नाही, असेही पवार म्हणाले.
Latest Videos