शरद पवार फिल्डवरचे नेते, दुष्काळावरुन सुप्रियांचा मुख्यमंत्र्यांना टोमणा
पुणे : “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे फिल्डवरचे नेते आहेत, म्हणून ते फिल्डवर असतात. काम कसं करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे”, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. मुख्यमंत्री सध्या मंत्रालयात बसून राज्यभरातील सरपंच, अधिकाऱ्यांशी फोनवरुन संवाद साधत आहेत. त्यावरुन सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. EVM नको […]
पुणे : “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे फिल्डवरचे नेते आहेत, म्हणून ते फिल्डवर असतात. काम कसं करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे”, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. मुख्यमंत्री सध्या मंत्रालयात बसून राज्यभरातील सरपंच, अधिकाऱ्यांशी फोनवरुन संवाद साधत आहेत. त्यावरुन सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.
EVM नको
दरम्यान, Evm विषयी शरद पवार यांनी घेतलेल्या संशयाबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आम्हाला ईव्हीएम नकोच, अशीच आमची भूमिका आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचा आवडता शब्द पारदर्शक आहे, पारदर्शकता हवी असेल तर evm नको”
मुख्यमंत्र्यांचा 6 जिल्ह्यांतील सरपंचांशी संवाद
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विविध सहा जिल्ह्यांमधील सरपंचांशी काल ऑडिओ ब्रीज सिस्टीमद्वारे संवाद साधून, गावागावांतील पाणी टंचाईची परिस्थिती जाणून घेतली. पुणे, सातारा, सांगली, चंद्रपूर, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील साधारण 150 हून अधिक सरपंचांशी बोलून मुख्यमंत्र्यांनी दुष्काळी परिस्थिती, पाणी टंचाई, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न आदी विविध विषयांवर सरपंचांकडून माहिती घेत त्यावर कार्यवाही करण्याच्या जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी सकाळी 11.30 पासून सलग झालेल्या बैठकांमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरपंचांशी मोबाईलवरुन थेट संवाद साधून, त्यांच्याशी दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली. या संवादात जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांचाही सहभाग होता.
मुख्यमंत्री म्हणाले, “दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने टंचाईसंदर्भातील कोणत्याही प्रस्तावावर विनाविलंब 48 तासाच्या आत निर्णय घ्यावा. प्रशासन आणि लोकांच्या एकत्रित सहभागातून या परिस्थितीवर निश्चित मात केली जाईल. त्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे. तहसीलदारांनी गावातील 2018 ची लोकसंख्या आणि जनावरांची संख्या विचारात घेऊन त्याप्रमाणे टँकरद्वारे पाणी पुरवठा होईल याची दक्षता घ्यावी.”