सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप नाही, सोलापूरशी ऋणानुबंध असल्याने दौरा : शरद पवार

शरद पवार यांनी सोलापूरला भेट देण्यामागे सोलापूरशी ऋणानुबंध असल्याचं कारण सांगितलं (Sharad Pawar on Solapur Corona Infection).

सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप नाही, सोलापूरशी ऋणानुबंध असल्याने दौरा : शरद पवार
Follow us
| Updated on: Jul 19, 2020 | 7:04 PM

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत सोलापूरचा दौरा केला. यात त्यांनी तेथील कोरोना नियंत्रणाच्या कामाची पाहणी करत आढावा घेतला. यावेळी त्यांनी आपण सोलापूरशी ऋणानुबंध असल्याने हा दौरा करत असल्याचं सांगितलं (Sharad Pawar on Solapur Corona Infection). तसेच सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करणार नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र, कोरोना नियंत्रणासाठी राज्य आणि केंद्र सरकारने आरोग्यमंत्र्यांना अधिक मदत करण्याची गरज असल्याचं शरद पवार यांनी नमूद केलं.

शरद पवार म्हणाले, “सोलापूर हे संकटावर मात करणारं शहर आहे. स्वातंत्र्यापूर्वी एक अशीच वेळ आली जेव्हा प्लेगची साथ आली होती. त्यावेळीही प्लेगवर मात करणाऱ्या ठिकाणांमध्ये सोलापूरचा समावेश होता. सोलापूरचं आणखी एक वैशिष्ट्य आहे ते आरोग्यमंत्री राजेश टोपे किंवा पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांना माहिती नसेल. स्वातंत्र्याच्या आधी स्वातंत्र्य चळवळीत ब्रिटिशांचं राज्य असताना अगदी मर्यादित काळासाठी ब्रिटिशांची सत्ता घालवण्यात एकच शहर यशस्वी झालं होतं ते म्हणजे सोलापूर.”

“हुताम्यांचं शहर म्हणून ओळख असलेल्या या सोलापूरने स्वातंत्र्यासाठी हौताम्य दिलं. त्यामुळे ब्रिटिशांना हरवणाऱ्या या शहराला कोरोनावर मात करणे फार अवघड नाही. त्यासाठी सोलापूरने एक मार्ग दाखवला तर तो संपूर्ण राज्यासाठी आणि देशासाठी उपयोगी ठरेल.”

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“कोरोना नियंत्रणासाठी आरोग्यमंत्र्यांना राज्य आणि केंद्र सरकारने अधिक मदत द्यावी”

“सोलापूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रशासन चांगलं काम करत आहेत. पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री यांचंही या कामात अधिक लक्ष आहे. त्यामुळे आज त्यांना केवळ राज्य सरकार आणि केंद्र सरकारने अनेक गोष्टींमध्ये अधिक मदत करणे गरजेचं आहे. रुग्णालयांमध्ये साधनांची गरज आहे. त्याची उपलब्धता करुन दिली पाहिजे. अधिक कर्मचारी हवे आहेत ते भरती केले पाहिजे. महापौरांनी नगरपालिकेच्या आरोग्य सुविधांमध्ये काही कमतरता असल्याचं सांगितलं आहे. त्यासाठी सरकारने काही अनुदान देऊन मदत केली पाहिजे,” असं शरद पवार यांनी सांगितलं.

“सोलापूरसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेणार”

“आम्ही या सर्व गोष्टींची नोंद केली आहे. या सर्व गोष्टींसाठी आम्ही तिघेही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेऊ. त्या दोघांच्या कानावर या गोष्टी घालू आणि या सर्व कमतरता दूर करु. यातून येथे यंत्रणांचं कोरोनावर नियंत्रण करण्याचं जे काही काम सुरु आहे त्याला हातभार लावू,” असंही शरद पवार यांनी नमूद केलं.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

“…म्हणून सोलापूरमधील मृत्यूदर अधिक”

शरद पवार म्हणाले, “शहराचा पूर्व भाग आणि त्याच्या आजूबाजूचा काही परिसर कामगार वर्ग आहे. या भागात गरिबी आहे, त्यामुळे हे लोक या रोगाला लवकर बळी पडण्याचं प्रमाण अधिक आहे. त्यांच्यात या रोगाला तोंड देण्यासाठीची रोगप्रतिकारक शक्तीची कमतरता आहे. त्यामुळे सोलापूरमधील मृत्यूदर अधिक आहे.”

“राम मंदिराऐवजी कोरोना संपवला पाहिजे” 

शरद पवार यांनी यावेळी राम मंदिराच्या प्रश्नावरही उत्तर दिलं. ते म्हणाले, “कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचं हे ठरवलं पाहिजे. आम्हाला वाटत की कोरोना संपवला पाहिजे. काही लोकांना वाटतं की मंदिर बांधून कोरोना जाईल. लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसान होत आहे. त्याकडे राज्य आणि केंद्र सरकारनं लक्ष दिलं पाहिजे. आमचे सहकारी खासदार आहेत ते दिल्लीत जाऊन प्रश्न मांडतील.”

खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या पिळवणुकीवर काय उपाययोजना?

कोरोना रुग्णांना उपचारासाठी खासगी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे मोजावे लागत आहे. आर्थिक परिस्थिती नसलेल्या रुग्णांची यात पिळवणूक होत आहे. या मुद्द्यांवर प्रश्न विचारला असता राजेश टोपे म्हणाले, “बिलांचा भार रुग्णांवर येऊ नये म्हणून जवळपास हजार रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेची कॅशलेस सेवा दिली जाते. तेथे कोरोनासोबतच इतर आजार असणाऱ्यांनाही शून्य बिल आलं पाहिजे अशी अपेक्षा असते.”

“महाराष्ट्र पहिलं राज्य आहे जेथे खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी ताब्यात घेतले. रुग्णालयांच्या बिलांवर मर्यादा आणल्या. लाखो रुपये बिल येत होतं तिथं आपण 4 हजार 500 रुपयांची मर्यादा ठेवली. आयसीयूसाठी हीच मर्यादा 7 हजार 500 रुपये निश्चित करण्यात आले आहे. यात चाचणीसह सर्व घटकांचा समावेश आहे. कोणतेही वेगळे शुल्क नाही,” असंही राजेश टोपे यांनी नमूद केलं.

संबंधित व्हिडीओ :

हेही वाचा :

शरद पवार राजेश टोपेंसह सोलापूर दौऱ्यावर, भरणेंच्या विनंतीवरुन दौरा

Corona Update | राज्यात तीन दिवसात 25 हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 3 लाखांच्या पार

Sharad Pawar on Solapur Corona Infection

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.