स्वतःच्या आजीचा इतिहास माहित नाही, त्यांना सावरकर काय कळणार? : शरद पोंक्षे

केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आहे. त्यामुळे आता तरी सावरकरांना ‘भारतरत्न’ मिळेल, अशी अपेक्षा शरद पोंक्षे यांनी व्यक्त केली.

स्वतःच्या आजीचा इतिहास माहित नाही, त्यांना सावरकर काय कळणार? : शरद पोंक्षे
Follow us
| Updated on: Jan 22, 2020 | 8:03 AM

पुणे : ज्या व्यक्तीला आपल्या आजीचा इतिहास माहित नाही, त्यांना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर काय समजणार? अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर थेट निशाणा (Sharad Ponkshe on Rahul Gandhi) साधला आहे.

केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आहे. त्यामुळे आता तरी सावरकरांना ‘भारतरत्न’ मिळेल, अशी अपेक्षा शरद पोंक्षे यांनी व्यक्त केली. धर्म गर्जना संस्थेतर्फे आयोजित ‘राष्ट्रभक्त सावरकर’ या विषयावर शरद पोंक्षे बोलत होते.

‘त्याच्या वक्तव्याला फारशी कोणी किंमत देत नाही, कारण ज्याला आपल्या आजीचा इतिहास माहित नाही, त्याला सावरकरांचा इतिहास माहित असण्याचं काही कारणच नाही. सावरकर तर फार मागचे आहेत. आजी म्हणजे कोण, तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी. आपल्या आजीचाच इतिहास पोराला माहिती नाही’ असा टोला शरद पोंक्षेंनी लगावला.

सचिन तेंडुलकरला ‘भारतरत्न’ दिलेला चालतो, मग स्वातंत्र्यवीर सावरकर यांना का नाही चालत? सावरकरांना ‘भारतरत्न’ दिला, तरच नव्या पिढीला त्यांच्या विचारांची आणि कार्याची जाणीव होईल. नवीन पिढीलाही सावरकर कळणे गरजेचे आहे, असं मत शरद पोंक्षे यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : …म्हणून मुख्यमंत्र्यांनी थिएटरमध्ये जाऊनही ‘तान्हाजी’ पाहिला नाही!

पंतप्रधान असताना इंदिरा गांधी यांनी सावरकर स्मारकासाठी 15 हजार रुपयांची देणगी स्वतःच्या खिशातून दिली होती, हेच त्यांना (राहुल गांधी) माहिती नाही. तसेच, इंदिरा गांधी यांच्यामुळेच टपाल तिकिटावर सावरकरांचे छायाचित्र झळकले होते. दुर्दैवाने राहुल गांधी यांना यातील काहीच माहीत नाही, असं शरद पोंक्षे पुढे म्हणाले.

प्रत्येक व्यक्ती जन्मतः हिंदू असतो. परंतु हिंदू म्हटल्यावर त्यामध्ये मुस्लिम, ख्रिस्ती, बौद्ध यांसारख्या विविध धर्मांना वगळता येत नाही. आपले गुणधर्मच आपला खरा धर्म आहे, असंही शरद पोंक्षे (Sharad Ponkshe on Rahul Gandhi) म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.