अस्पृश्यता निवारणात आंबेडकर आणि फुलेंपेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ : शरद पोंक्षे

"अस्पृश्यता निवारणाचं सावरकरांचं मोठं योगदान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंपेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ" असल्याचा दावा अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe on Veer Savarkar) यांनी केला आहे.

अस्पृश्यता निवारणात आंबेडकर आणि फुलेंपेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ : शरद पोंक्षे
Follow us
| Updated on: Mar 01, 2020 | 3:21 PM

पुणे : “अस्पृश्यता निवारणाचं सावरकरांचं मोठं योगदान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंपेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ” असल्याचा दावा अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe on Veer Savarkar) यांनी केला आहे. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात मी सावरकर वकृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. शरद पोक्षेंच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता (Sharad Ponkshe on Veer Savarkar) आहे.

“अस्पृश्यता निवारणाचं सावरकरांचं मोठं योगदान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंपेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ आहे. यावेळी त्यांनी महात्मा गांधींच्या अहिंसा या तत्वाचीही हेटाळणी केली. आंबेडकर आणि महात्मा फुले हे त्या त्या जातीत जन्माला आल्याने त्यांना अपमानाचे चटके बसले. त्यामुळे विद्रोह करत प्रवाहाविरोधात लढले. मात्र अपमानाचा कोणताही चटका बसला नसतानाही सावरकर ब्राह्मण विरोधात उभे राहतात. समाजातील जातीच्या भिंती फोडण्यासाठी आयुष्य व्यतीत करतात. त्यामुळे दोन्ही राष्ट्रपुरुषांपेक्षा सावरकर कांकणभर श्रेष्ठ” असल्याचा दावा पोंक्षे यांनी केला.

“स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याची वाट कशाला पाहायची. महात्मा गांधी, महात्मा फुले यांना महात्मा उपाधी सरकारने दिली होती का, सावरकरांना स्वातंत्र्यवीर ही उपाधी सरकारने दिली होती का? त्यामुळे आता आपण भारतरत्न स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अशीच सुरुवात करायची. यामुळे भारतरत्न पुरस्काराचा सन्मान होईल”, असं अभिनेते शरद पोंक्षे म्हणाले.

“राहुल गांधी यांचा नामोल्लेख टाळत त्यांना दिल्लीत वेडा मुलगा म्हणत हेटाळणी केली. दिल्लीतील वेडा मुलगा काहीतरी बडबड करत असून मी त्याचे आभार मानतो. हिंदू फार थंड असून पेटायला वेळ लागतो. ब्रिटिशांप्रमाणेच आजही सावरकर यांची भीती आणि दहशत आहे. त्या वेड्या मुलाने असंच बोलत राहावे, मात्र त्याला त्याच्या आजीचा इतिहास माहित नाही. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी सावरकर यांच्या स्मारकाला निधी दिला. त्याचबरोबर पोस्टाच्या तिकिटावर सावरकरांचे छायाचित्रे प्रसिद्ध केले होते”, असं शरद पोंक्षे यांनी सांगितलं.

“यावेळी बोलताना शरद पोंक्षे यांनी स्वामी विवेकानंदांचा दाखला देत पृथ्वीतलावर जन्माला येणारा प्रत्येक मुलगा हिंदू असतो. मग त्याचे आई-वडील त्यावर धर्मानुसार संस्कार करुन सभासद करतात. इथून कट्टरता सुरु होते मात्र हिंदू कट्टर नसल्याचं त्यांनी सांगितलं. देशात बहुसंख्य 80 टक्के हिंदू असून हे हिंदू राष्ट्र आहे. जगावर एक दिवस हिंदू राज्य असेल”, असाही दावा शरद पोंक्षे यांनी केला.

“पोंक्षे यांनी अहिंसा या शब्दाची खिल्ली उडवत महात्मा गांधींनाही लक्ष्य केलं. अहिंसा हा शब्दच अनैसर्गिक आहे. सर्वोत्तम राज्यकर्ते म्हणून रामराज्य आणि शिवशाही याचा उल्लेख केला जातो. मात्र छत्रपती आणि प्रभू रामानेही युद्धाने यश मिळवल आहे. प्रभू रामाने अहिंसा नाहीतर युद्ध करून रक्त सांडलं. अण्णा हजारेंसारखं लंकेत स्टेज बांधून आंदोलन केलं असतं तर काय झालं असते”, असा सवाल ही केला.

“नशीब, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बापूजी जन्माला आले नाहीत. शिवाजी महाराज निशस्त्र अफजलखानाला भेटायला गेल्यास त्यानं महाराजांना संपवून टाकले असतं. तो संपविण्यासाठी विडा उचलून आला होता. मात्र अस म्हणलं की मुसलमानाच्या भावना दुखावतात. आम्ही ब्राह्मण रावणाला जाळून टाकतो हिंदू होता तपस्वी होता त्याला जाळल्यावर आमच्या भावना दुखावल्या जात नाहीत. मात्र अफजल खानाचा कोथळा काढल्यावर कशा भावना दुखावल्या जातात असे राज्यकर्ते असतात का”, असा सवालही पोंक्षे यांनी केला.

“शिवाजी महाराजांचा इतिहास सांगायचा आणि मुस्लिम शब्द वापरायचा नाही. महाराज मुसलमानांच्या विरोधात नव्हते हा कुठला शोध काढला. शिवाजीमहाराज त्याक्षणीच संपले असते तर या व्यासपीठावर शरद पोंक्षे ऐवजी शरद उल्ला खानचा कव्वालीचा कार्यक्रम असता. आमच्या माता-भगिनी एवढ्या सुंदर दिसतात त्या कशा दिसतात हे सुद्धा समजलं नसते. राजा निशस्त्र झाल्यावर जनतेचा विश्वास कसा राहील”, असाही सवाल पोंक्षेंनी केला.

पोंक्षे यांच्या या वादग्रस्त विधानानंतर त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी त्यांच्यावर उपरोधात्मक टोला लगावला आहे.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.