माटेगावकर तुझी अभिनेत्री, बापट तुझी लेखिका, सुजय डहाकेच्या ‘ब्राह्मण अभिनेत्री’ वादावर शशांक केतकर आक्रमक

अभिनेता शशांक केतकरने फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत सुजय डहाकेच्या विधानावर आक्रमक पवित्रा घेतला.

माटेगावकर तुझी अभिनेत्री, बापट तुझी लेखिका, सुजय डहाकेच्या 'ब्राह्मण अभिनेत्री' वादावर शशांक केतकर आक्रमक
Follow us
| Updated on: Mar 05, 2020 | 4:45 PM

मुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक सुजय डहाके याने केलेल्या (Shashank Ketkar Facebook Post) विधानावरुन सध्या मराठी मनोरंजन विश्वात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. “मराठी मनोरंजन श्रेत्रातील प्रत्येक मालिकेमध्ये मुख्य भूमिकेमध्ये ब्राह्मण मुलीच दिसतात. मग इतर मराठी मुली का नाही?”, असा सवाल ‘केसरी’ चित्रपटाचा दिग्दर्शक सुजय डहाके याने उपस्थित केला. ‘लोकसत्ता’ दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्याने हे विधान केलं होतं.

हेही वाचा : ‘मराठी मालिकांमध्ये ब्राह्मण अभिनेत्रीच का?’ सुजय डहाकेच्या प्रश्नाचा मालिका विश्वातून समाचार

सुजय डहाकेने केलेल्या या विधानावर मराठी सिनेमासृष्टीतील अनेक (Shashank Ketkar Facebook Post) कलाकारांनी आपला रोष व्यक्त केला आहे. अभिनेता शशांक केतकरनेही फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत सुजय डहाकेच्या विधानावर आक्रमक पवित्रा घेतला.

‘तू कसले बिन बुडाचे आरोप करतोस’

“माटेगावकर तुझी अभिनेत्री, बापट तुझी लेखिका, देवधर तुझा अभिनेता, जोशी तुझा संगीत दिग्दर्शक आणि तू कसले बिन बुडाचे आरोप करतोस रे. आपल्या क्षेत्रात फक्त टॅलेंट ला जागा आहे”, असं मत केतकरने त्याच्या फेसबुक पोस्टमधून व्यक्त केलं.

हेही वाचा : हिंदू-मुस्लिम एकतेवर रितेश देशमुखचा टिक टॉक व्हिडीओ

‘कांबळे, छल्लारे आणि पवार यांच्या दिग्दर्शनाखाली हा केतकर रोज काम करतो’

“दुसानिस ही माझी सह कलाकार आणि शेलार आणि गुप्ते या आडनावाच्या अभिनेत्री माझ्या आई ची भूमिका करतात ! कांबळे, छल्लारे आणि पवार यांच्या दिग्दर्शनाखाली हा केतकर रोज काम करतो आणि याचा मला अभिमान आहे.”

शशांक केतकरची फेसबुक पोस्ट

माटेगावकर तुझी अभिनेत्री, बापट तुझी लेखिका, देवधर तुझा अभिनेता, जोशी तुझा संगीत दिग्दर्शक आणि तू कसले बिन बुडाचे आरोप करतोस रे. आपल्या क्षेत्रात फक्त टॅलेंट ला जागा आहे. कृपा करून हे असले स्टंट करू नकोस. त्या पेक्षा तुझ्या कामावर लक्ष दे जमल्यास. साने आणि मंजुळे हे कॉम्बिनेशन पुरेस नाहीये का तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला? असो ….. दुसानिस ही माझी सह कलाकार आणि शेलार आणि गुप्ते या आडनावाच्या अभिनेत्री माझ्या आई ची भूमिका करतात ! कांबळे, छल्लारे आणि पवार यांच्या दिग्दर्शनाखाली हा केतकर रोज काम करतो आणि याचा मला अभिमान आहे. तू कोणत्या जाती धर्माचा आहेस याचा तसूभरही विचार डोक्यात न आणता तुझं कल्याणच होऊदे, तुझे चित्रपट चालुदे हीच इच्छा आहे ?

तुझ्या reference साठी ही एक FB post वाच –

“सुरू असलेल्या मालिका ” बाळू मामा – कोमल मोरे राजा राणी – शिवानी सोनार छत्रपती संभाजी – प्राजक्ता गायकवाड स्वामींनी – सृष्टी पगारे Mrs मुख्यमंत्री – अमृता घोंगडे विठू माउली – एकता लब्धे प्रेमाचा गेम सेम टू सेम – सायली जाधव वैजु नं 1 – सोनाली पाटील

“या पूर्वीच्या मालिका ” तू अशी जवळी रहा – तितिक्षा तावडे आम्ही दोघी-. खुशबू तावडे मानसीचा चित्रकार तो -अक्षया गुरव एक राजकन्या – किरण धाणे जुळून येती रेशीमगाठी. – प्राजक्ता माळी छत्री वाली – नम्रता प्रधान साता जन्माच्या गाठी – अक्षया हींदलकर सगळ्या उत्तम अभिनेत्री आहेत, आणि त्यांना टॅलेंट मुळे कामं मिळाली आहेत.. कोणतही चॅनल जात , धर्म बघून काम देत नाही तर talent बघून काम देत.. असो.

हेही वाचा : मुंबईची भाषा हिंदी, सब टीव्हीवरील ‘तारक मेहता’चा ‘उल्टा’ प्रताप, मनसेकडून सरळ करण्याचा इशारा

मी ब्राह्मण नाही, तरी माझ्याकडे काम : तेजश्री प्रधान

सुजयच्या वक्तव्याचा मराठी मालिकाविश्वातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. ‘अगंबाई सासूबाई’ मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने फेसबुक पोस्टवरुन सुजयला टोला हाणला आहे. ‘मी ब्राह्मण नाही, सीकेपी आहे. माझ्याकडे काम आहे. याला टॅलेंट म्हणूया का?’ असा (Shashank Ketkar Facebook Post) तिरका सवाल तिने विचारला आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.