शिर्डीत तपासणीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीला ‘बॅड टच’, डॉक्टरला बेड्या

डॉक्टरनेच तपासणीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा (Shirdi minor girl molestation) आरोप होत आहे. शिर्डीत हा प्रकार घडला.

शिर्डीत तपासणीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीला 'बॅड टच', डॉक्टरला बेड्या
Follow us
| Updated on: Sep 21, 2020 | 9:00 PM

 अहमदनगर : डॉक्टरनेच तपासणीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा (Shirdi minor girl molestation) आरोप होत आहे. हा धक्कादायक प्रकार शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालायात घडल्याचा दावा करण्यात येत आहे. तपासणी करत असलेल्या डॉक्टरनेच हे कृत्य केल्याचा आरोप झाल्याने परिसरात अस्वस्थततेचं वातावरण आहे.

हा प्रकार 19 सप्टेंबरला पहाटे 5 वाजता घडल्याचं सांगण्यात येत आहे. याप्रकरणी आरोपी डॉक्टरला अटक केली असून चौकशी सुरु आहे.

संबंधित मुलगी 19 सप्टेंबरला ताप आणि श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे, वडिलांसोबत साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात तपासणीसाठी गेली. डॉक्टरने वडिलांना बाहेर थांबवत मुलीला अपघात विभागात नेले. तपासणी करत असताना आरोपी डॉक्टरने मुलीला नको त्या ठिकाणी स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

मुलीने वडिलांना बोलवत ‘इथे उपचार नको’ असे सांगितले. पण तपासणी करताना अनावधानाने हात लागला असेल म्हणून वडिलांनी मुलीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले.

प्रकाराची शाहनिशा करण्यासाठी ऑडिओ रेकॉर्डिंगचा वापर

घडलेल्या प्रकाराचे गांभीर्य ओळखून शाहानिशा करण्यासाठी पीडित मुलीच्या वडिलांनी मोबाईलमधील ऑडिओ रेकॉर्डिंगचा वापर केला. मुलीचे वडील दुसऱ्या दिवशी मुलीला पुन्हा दवाखान्यात घेऊन गेले. मुलीच्या हातात मोबाईलमधील ऑडिओ रेकॉर्डिंग सुरु करुन डॉक्टरकडे पाठवले.

Amravati | तरुणीच्या गुप्तांगातून स्वॅबचे नमुने, आरोपी लॅब टेक्निशियनविरोधात विनयभंगाचा गुन्हा 

पूर्ण रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर मुलीच्या विनयभंगाची घटना खरी असल्याचे पीडित मुलीच्या वडिलांना पटले. त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी धाडस करत शिर्डी पोलीस ठाण्यात डॉक्टरविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपी डॉक्टरविरोधात बाल लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत कलम 8 आणि 10 नुसार तसेच भा.द.वि कलम 354 ( अ ),( ब ) अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली.

दरम्यान पीडित मुलीला कोरोनासदृश लक्षणे आढळ्याने मुलगी तपासणीसाठी गेल्यानंतर हा प्रकार घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. यापूर्वी कोव्हिड सेंटरमध्ये महिलांवर बलात्काराचे प्रकारही घडले आहेत. एकीकडे कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे, तर दुसरीकडे तपासणी करण्यास गेले असता असे गंभीर प्रकार घडत आहेत. त्यामुळे महिलांच्या असुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

(Shirdi minor girl molestation)

संबंधित बातम्या 

पारनेरच्या तहसीलदारांचा विनयभंग केल्याचा आरोप, भाजप नेत्यावर गुन्हा दाखल   

पुण्यातील खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित महिलेचा विनयभंग, आरोपी वॉर्डबॉयला अटक   

Amravati | तरुणीच्या गुप्तांगातून स्वॅबचे नमुने, आरोपी लॅब टेक्निशियनविरोधात विनयभंगाचा गुन्हा 

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.