शिर्डीत 8 लाख भक्तांकडून साईबाबांचं दर्शन, 11 दिवसात 16 कोटींपेक्षा अधिक दान

शिर्डीत ख्रिसमस सुट्टी आणि नवीन वर्षाच्या स्‍वागतासाठी आलेल्या साईभक्तांनी बाबांना भरभरुन दान (shirdi saibaba donation) दिलं आहे.

शिर्डीत 8 लाख भक्तांकडून साईबाबांचं दर्शन, 11 दिवसात 16 कोटींपेक्षा अधिक दान
Follow us
| Updated on: Jan 03, 2020 | 9:25 PM

अहमदनगर : शिर्डीत ख्रिसमस सुट्टी आणि नवीन वर्षाच्या स्‍वागतासाठी आलेल्या साईभक्तांनी बाबांना भरभरुन दान (shirdi saibaba donation) दिलं आहे. गेल्या अकरा दिवसात आलेल्या साईभक्तांनी जवळपास 16 कोटी 93 लाख रुपये साईचरणी अर्पण केले आहेत. या दानात सोने चांदीचाही समावेश आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षीच्या दानात 3 कोटींनी वाढ झाली आहे. देशात सर्वत्र आर्थिक मंदी असताना साईंच्या झोळीत मात्र कोटींचे दान प्राप्त झालं (shirdi saibaba donation) आहे.

ख्रिसमसची सुट्टी त्यासोबतच नववर्षाच्या स्वागतासाठी 23 डिसेंबर ते 02 जानेवारी 2020 या काळात सुमारे 8 लाख साईभक्तांनी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतले. या 11 दिवसांच्या कालावधीत साईभक्तांनी 16 कोटी 93 लाख रुपयांचे दान साईचरणी अर्पण केलं आहे. याशिवाय 12 किलो सोनं आणि 17 किलो चांदी साईबाबांना अर्पण करण्यात आलं आहे.

साईंच्या झोळीत 2019 या वर्षात 292 कोटी रुपये दानाच्या स्वरुपात प्राप्त झाले आहे. दिवसेंदिवस साईंच्या दानात वाढ होत असून 2300 कोटींच्या ठेवी विविध बँकांत जमा असल्याची माहिती दिपक मुगळीकर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली (shirdi saibaba donation)  आहे.

साईंच्या चरणी दान

    • दानपेटीत – 9 कोटी 54 लाख
    • देगणी कांऊटरवर – 3 कोटी 46 लाख
    • चेक,डिडी, मनिऑर्डरद्वारे – 1 कोटी 51 लाख
    • डेबीट/ क्रेडीट कार्ड – 1 कोटी 38 लाख
    • ऑनलाईन देणगी – 73 लाख
    • परकीय चलन – 24 लाख
    • सोने – 1 किलो 213 ग्रॅम ( 42 लाख )
    • चांदी – 17 किलो ( 24 लाख )

एकूण रक्कम – 16 कोटी 93 लाख (11 दिवस)

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.