मोदी सरकारला मोठा धक्का, अकाली दलाची एनडीएतून बाहेर पडण्याची घोषणा

मोदी सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना (Agriculture Bills) विरोध म्हणून अकाली शिरोमणी (Akali Dal) दलाने मोठा निर्णय घेतला आहे (Shiromani Akali Dal going to be out of NDA).

मोदी सरकारला मोठा धक्का, अकाली दलाची एनडीएतून बाहेर पडण्याची घोषणा
Follow us
| Updated on: Sep 26, 2020 | 11:33 PM

नवी दिल्ली : मोदी सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना (Agriculture Bills) विरोध म्हणून शिरोमणी अकाली दलाने (Akali Dal) मोठा निर्णय घेतला आहे (Shiromani Akali Dal going to be out of NDA). अकाली दलाने आता थेट राष्ट्रीय लोकशाही आघाडीतूनच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. याआधीच अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी कृषी कायद्यांच्या विरोधात आपल्या कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता अकाली दलाने थेट आघाडीतूनच बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय.

शिरोमणी अकाली दलाच्या कोअर कमेटीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत अकाली दलाने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. अकाली दलाने आपल्या फेसबुक पेजवर कोअर कमेटीची बैठक लाईव्ह घेऊन या निर्णयाची घोषणा केली आहे.

कोअर कमेटीच्या बैठकीनंतर अकाली दलाने म्हटलं, , “मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या पिकांना किमान आधारभूत किंमत (MSP) देण्याची हमी न दिल्याने शिरोमणी अकाली दल (SAD) राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडत आहे. केंद्र सरकारची पंजाबी आणि शिखांच्या मुद्द्यावरही असंवेदनशीलता सुरु आहे.”

दरम्यान, मोदी मंत्रिमंडळातील अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी सरकार शेतकरी विरोधी विधेयक आणत असल्याचा आरोप करत थेट राजीनामा दिला होता. त्यावेळी हरसिमरत कौर यांनी ट्वीट करत म्हटलं होतं, “मी शेतकरी विरोधी विधेयक आणि कायद्यांचा विरोध करत केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे. शेतकऱ्याची मुलगी आणि बहिण म्हणून त्यांच्यासोबत उभी राहिल्याचा मला अभिमान आहे.” सुखबीर सिंह लोकसभेत बोलताना म्हणाले, “जर सरकारने आज शेतकरी विरोधी विधयेक मांडली तर अकाली दलाच्या केंद्रीय मंत्री आपला राजीनामा देतील.”

“पंजाबमधील 20 लाख शेतकऱ्यांवर नव्या शेतकरी कायद्याचा परिणाम”

बादल म्हणाले, “शिरोमणि अकाली दल या विधेयकाचा तीव्र विरोध करते. देशासाठी तयार करण्यात येणाऱ्या प्रत्येक विधेयकावर देशातील काही भाग आनंदी असतो तर काही भाग त्याला विरोध करतो. सरकारच्या नव्याने येणाऱ्या 3 कायद्यांचा पंजाबमधील 20 लाख शेतकऱ्यांवर प्रभाव पडणार आहे. 30 हजार आडते, कृषी बाजारातील 3 लाख मजूर आणि 20 लाख शेतीतील मजूरांवर याचा दुष्परिणाम होणार आहे.”

विरोध होत असलेले विधयकं

  1. शेतकऱ्यांचं उत्पन्न, व्यापार आणि किसानों के उत्पाद, व्यापार आणि व्यवसाय संवर्धन सेवा विधेयक
  2. हमीभाव आणि कृषी सेवा विधेयक आणि शेतकरी सशक्तीकरण आणि संरक्षण विधेयक
  3. आवश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक

संबंधित बातम्या :

वाढदिवशी पंतप्रधान मोदींना मोठा झटका, शेतकरी विधेयकाविरोधात महिला मंत्र्याचा राजीनामा

Bharat Band LIVE | कृषी विधेयकाविरोधात ‘भारत बंद’, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कृषी विधेयकाच्या जीआरची होळी

कृषी विधेयकावरुन सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, निलंबित खासदारांचा रात्रीचा मुक्कामही संसदेबाहेरच

संबंधित व्हिडीओ :

Shiromani Akali Dal going to be out of nda after new Farm Bill 2020

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.