शिवसेना आणि राष्ट्रवादीनेच नितीन राऊतांचा गेम केला: बबनराव लोणीकर

नितीन राऊत यांना आपल्या वक्तव्यावरुन घुमजाव करावे लागले | Babanrao Lonikar

शिवसेना आणि राष्ट्रवादीनेच नितीन राऊतांचा गेम केला: बबनराव लोणीकर
Follow us
| Updated on: Nov 29, 2020 | 11:39 PM

परभणी: राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजबिल माफीची घोषणा केली होती. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचा गेम केल्यामुळे नितीन राऊत (Nitin Raut) यांना आपल्या वक्तव्यावरुन घुमजाव करावे लागले, असा दावा माजी मंत्री आणि भाजप नेते बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी केला. (Shiv Sena and NCP backstab Nitin Raut says Babanrao Lonikar)

महाविकासआघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त बबनराव लोणीकर यांनी रविवारी परभणीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बबनराव लोणीकर यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. महाविकासआघाडीने वर्षभरापूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्ती केलेली नाही. हे सरकार नापास झाले आहे, असे त्यांनी म्हटले.

फडणवीस सरकारची जलयुक्त शिवार ही योजना लोकप्रिय होती. पण महाविकासआघाडी सरकारने ती बंद केली. स्थानिक लोकप्रतिनिधी फडणवीसांना विरोध करत असले तरी उद्घाटनाचे नारळ फोडताना आनंदी होते. या योजनेचं नाव बदलून ती सुरु ठेवायला हवी होती. पण तसे या सरकारने केले नाही. यामुळे मराठवाड्याचा दुष्काळ कमी झाला असता, असे बबनराव लोणीकर यांनी म्हटले.

राज्यात मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री होऊन गेले. सध्याच्या सरकारमध्ये अनेक मराठा नेते मंत्री आहेत. राज्याच्या अनेक भागात मराठा नेत्यांच्या शिक्षणसंस्था आहेत. तरीही आजवर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही.

मुख्यमंत्री सहायता निधीतून होणाऱ्या मदतीचे वाटपही बंद आहे. यासाठी सहायता कक्ष नेमण्यात आला होता. या कक्षाकडे अनेक फाईल्स आल्या होत्या. यापैकी अनेकांना शासनाकडून मदतच मिळाली नाही, असेही लोणीकर यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांना उलटं टांगण्याची धमकी; बबनराव लोणीकरांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

भाजपचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांची कथित ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली आहे. जिल्ह्यातील व्यापाऱ्याच्या घरावर बेकायदेशीर धाड टाकणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी चांगलीच खरडपट्टी काढल्याचं या कथित ऑडिओ क्लिपमधून समोर आले आहे.

पोलिसांना दमदाटी करताना या कथित ऑडिओ क्लिपमध्ये बबनराव लोणीकर यांची जीभ घसरली असून, त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला विधानसभेत उलटं टांगण्याची भाषा वापरली. त्यामुळे बबनराव लोणीकर यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

संबंधित बातम्या: 

पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह, राज्य सरकारचे आरटीपीसीआर किट बोगस : बबनराव लोणीकर

वीजबिल माफीवरुन नितीन राऊतांकडून फसवणूक, विधानसभेत हक्कभंग आणणार; बबनराव लोणीकर संतापले

अधिकाऱ्यांना उलटं टांगण्याची धमकी; बबनराव लोणीकरांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

(Shiv Sena and NCP backstab Nitin Raut says Babanrao Lonikar)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.