बेईमानीने वागणाऱ्यांनी शिवसेनेच्या वाकड्यात शिरु नये, तुमच्या घरावर फेकायला आमच्याकडे खूप दगड आहेत; राऊतांचा कंगनाला इशारा

कंगनाच्या अनधिकृत कार्यालयाचे बांधकाम पाडणाऱ्या जेसीबीला पद्मश्री पुरस्कार मिळणार आहे. | Sanjay Raut

बेईमानीने वागणाऱ्यांनी शिवसेनेच्या वाकड्यात शिरु नये, तुमच्या घरावर फेकायला आमच्याकडे खूप दगड आहेत; राऊतांचा कंगनाला इशारा
Follow us
| Updated on: Nov 14, 2020 | 11:34 AM

मुंबई: अभिनेत्री कंगना रानौत हिनेच मुंबई महानगरपालिकेला (BMC) ‘मी येते, तुम्हाला जे उखडायचेय ते उखाडा’, असे आव्हान दिले होते. एक महिला म्हणून मुंबई महानगरपालिकेने तिच्या इच्छेचा मान ठेवला आणि तिचे अनधिकृत कार्यालय पाडले, अशी खोचक टिप्पणी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. पालिकेने कंगनाचे कार्यालय पाडल्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये ‘उखाड दिया’, अशा मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली होती. ही ‘सामना’ची स्टाईल आहे, त्यामध्ये काहीही चूक नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. (sanjay raut in shut up ya kunal interview)

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) याने काही दिवसांपूर्वीच ‘शट अप या कुणाल’ (Shut up Ya kunal) या कार्यक्रमासाठी संजय राऊत यांची मुलाखत घेतली होती. ही मुलाखत शुक्रवारी रात्री यू ट्यूबवर प्रसारित करण्यात आली. यामध्ये संजय राऊत यांनी शिवसेनेवर टीका करणाऱ्या अभिनेत्री कंगना रानौतला चांगलेच चिमटे काढले.

कंगनाच्या अनधिकृत कार्यालयाचे बांधकाम पाडणाऱ्या जेसीबीला पद्मश्री पुरस्कार मिळणार आहे, असे मी ऐकले आहे. हा जेसीबी अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी उपयोगी पडतो. केवळ कंगना रानौतच्या कार्यालयावरच कारवाई झाली असे नव्हे. मुंबईत अनेक ठिकाणी अवैध बांधकामे आहेत. त्या सगळ्यांविरोधात मुंबई महानगरपालिका कारवाई करते, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

यावेळी संजय राऊत कंगना रानौत हिला अप्रत्यक्ष टोलाही लगावला. ‘शीशे के घरों में रहने वाले दूसरों के घरों पर पत्थर नहीं फ़ेंकते’, या डायलॉग सगळ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे. तुम्ही चूक केली असेल, अप्रमाणिकपणे वागला असाल तर शांत बसण्यातच शहाणपण आहे. अन्यथा शिवसेनेकडे तुमच्या घरावर फेकण्यासाठी खूप दगड आहेत, असा गर्भित इशाराही संजय राऊत यांनी दिला.

संबंधित बातम्या:

भाजपसोबत आमचा भावनिक बंध होता, 25 वर्षांचं नातं तोडताना खूप दु:ख झालं: संजय राऊत

जुनी थडगी उकरली तर तुमच्याच पापाचे सांगाडे दिसतील; राऊतांचा किरीट सोमय्यांना इशारा

‘बाळासाहेबांनी मला 28 व्या वर्षी संपादक बनवलं, म्हणून….’ कुणाल कामराच्या ‘त्या’ प्रश्नावर संजय राऊतांचं भावनिक उत्तर

बराक ओबामांना भारतीय नेत्यांविषयी बोलण्याचा अधिकार कोणी दिला; शिवसेनेकडून राहुल गांधींची पाठराखण

(sanjay raut in shut up ya kunal interview)

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.